Mumbai Goa Vande Bharat Express : कोकण रेल्वे मार्गावर मोठा गाजावाजा करत वंदे भारत एक्स्प्रेस सुरु झाली आहे. सुपरफास्ट रेल्वे म्हणून तिला सुरुवातीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, वंदे भारत एक्प्रेसमुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या महत्त्वाच्या 5 गाडया सायडिंगला पडणार आहेत. त्यामुळे या गाड्यांतून प्रवास करणाऱ्यांना काहीसा उशीर होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईहून सुटणारी वंदे भारत एक्स्प्रेस सेमी हायस्पीड दर्जाची वातानुकूलित एक्प्रेस आठ तासांत मडगावला पोहोचवण्याचे उद्दिष्ट रेल्वेने ठेवले आहे. त्यामुळे या गाडीला नेहमीच ट्रॅक उपलब्ध करुन द्यावा लागणार आहे. त्याचा फटका सर्वसामान्यांसाठी याच मार्गावर धावणाऱ्या पाच लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेसना  बसणार आहे. वंदे भारत बाजू देण्यासाठी या गाड्या सायडिंगला टाकल्या जाणार आहेत. त्यामुळे सामान्य प्रवाशांना ताटकळत राहावे लागणार आहे. 


वंदे भारत एक्प्रेस मुंबईतून पहाटे 5.25 वाजता सुटणार असून मान्सून वेळापत्रकाप्रमाणे दुपारी तीनच्या सुमारास तर एरवी दुपारी एक वाजता मडगावला पोहोचणार आहे. त्यामुळे या कालावधीत कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या पाच लांब पल्ल्याच्या गाड्यांना नेहमी सायडिंगला टाकले जाणार आहे. यामध्ये नागपूर-मडगाव, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस, मंगला एक्स्प्रेस या गाड्या थांबवून ठेवण्यात येणार आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव तेजस एक्स्प्रेस या गाडीलाही नेहमीच लेटमार्क लागणार आहे. तसेच दुपारी मडगावहून मुंबईसाठी सुटणारी तेजस एक्स्प्रेसही सायडिंगला पडणार असल्याची माहिती रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने दिली.


वंदे भारत सुरु झाल्यानंतर चांगला प्रतिसाद मिळाला आहे. शुक्रवारचे बुकिंग फुल्ल झाले होते. या पहिल्या फेरीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ट्रेन क्रमांक 22229 सीएसएमटी-मडगाव वंदे भारत या एक्प्रेसचे बुकिंग फुल्ल झाले आहे. सायंकाळपर्यंत  चेअर कारच्या 512 पैकी 463 सीट बुक झाल्या होत्या, तर एक्झिक्युटिव्ह कोचमधील सर्व सीट बुक झाल्यात.


या गाड्यांना वंदे भारतचा फटका


वंदे भारत एक्प्रेसला कोकण रेल्वे मार्गावर प्राधान्याने ट्रॅक उपलब्ध करून घ्यावा लागणार असल्याने पाच गाड्यांना फटका बसणार आहे.


ट्रेन क्रमांक - 01139 कल्याण-मडगाव 
ट्रेन क्रमांक - 12051 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव
ट्रेन क्रमांक - 12618 हजरत निजामुद्दीन-एर्नाकुलम मंगला एक्स्प्रेस
ट्रेन क्रमांक - 22119 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-तेजस एक्स्प्रेस
ट्रेन क्रमांक - 22120 मडगाव-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तेजस एक्स्प्रेस


वंदे भारत : मुंबई ते मडगांवपर्यंत प्रत्येक ठिकाणचा तिकिट दर पाहा


मुंबई CSMT - मडगाव -  एसी चेअर कार -1815 रुपये आणि EC Executive Class साठी 3360 रुपये


मुंबई दादर  - मडगाव -  एसी चेअर कार -1815 रुपये आणि EC Executive Class साठी 3360 रुपये


मुंबई CSMT  - रत्नागिरी -  एसी चेअर कार -1120 रुपये आणि EC Executive Class साठी 2125 रुपये


पनवेल - रत्नागिरी - सीसी एसी चेअर कार -1010 रुपये आणि EC Executive Class साठी 1900 रुपये


रत्नागिरी  - मडगाव -  एसी चेअर कार -1055 रुपये आणि EC Executive Class साठी 1880 रुपये


मुंबई CSMT  - कणकवली -  एसी चेअर कार -1365 रुपये आणि EC Executive Class साठी 2635 रुपये


पनवेल - कणकवली -  सीसी एसी चेअर कार -1270 रुपये आणि EC Executive Class साठी 2450 रुपये


कणकवली - मडगाव -  एसी चेअर कार - 790 रुपये आणि EC Executive Class साठी 1355 रुपये


मुंबई CSMT - मडगाव -  एसी चेअर कार -1815 रुपये आणि EC Executive Class साठी 3360 रुपये


पनवेल - थिविंम -  सीसी एसी चेअर कार -1660 रुपये आणि EC Executive Class 3015 रुपये