पुणे : पुण्यातील भोरमधील भाटघर धरणात पाच तरुणी बुडाल्याची दुदैवी घटना घडलीय. फोटो शूट करताना ही घटना घडलीय. या पाचही तरूणी पुण्याच्या हडपसरमधील रहिवासी आहेत. त्या धरणावर पर्यटनासाठी आल्या होत्या. खुशबू लंकेश रजपूत, मनीषा लखन रजपूत, चांदनी रजपूत, पूनम राजपूत, मोनिका चव्हाण अशी बुडालेल्या तरूणींची नावं आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

5 पैकी 3 तरुणींचे मृतदेह सापडले आहेत. तर 2 तरुणींचा शोध अजुनही सुरु आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने या तरुणी पाण्यात बुडाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.


तरुणींचा शोध घेण्यासाठी रेस्क्यू टीम आणि गावकऱ्यांकडून शोधकार्य सुरू आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.