नाशिक : जिल्ह्यातील चामर लेणी डोंगरकड्यावर ५ जण अडकले आहेत, यात शाळेतील मुलांना वाचवताना एक तरूण टेकडीवरून खाली घसरला असल्याचंही सांगण्यात येत आहे. मात्र याविषयी प्रशासनाने कोणताही दुजोरा दिलेला नाही.


एक तरूण टेकडीवरू खाली घसरला?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही मुलं ट्रेकिंगसाठी चामर लेणीवर आले होते,  त्यावेळी काही मुलं खाली घसरत होती, तर काहींना वर येता येत नव्हते.


मुलांना वाचवण्याचा प्रशासनाकडून प्रयत्न


यावेळी मुलांना वाचवताना एक तरूण टेकडीखाली घसरल्याचं सांगण्यात येत आहे, या मुलांना वाचवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे.


स्थानिक जाणकारांची मदत आवश्यक


या घटनेत ५ युवक टेकडीवर अडकले आहेत, आता प्रशासन यांची सुटका करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. याबाबतीत स्थानिक जाणकारांची मदत घेतली जाण्याची शक्यता आहे.