शिर्डी : साईबाबांच्या भक्तांसाठी एक खुशखबर आहे... आता मुंबईहून शिर्डीला पोहचण्यासाठी तुम्हाला केवळ ४५ मिनिटांचा कालावधी पुरेसा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिर्डीसाठी लवकरच विमानसेवा सुरू होणार आहे. नुकतीच या विमानसेवेची चाचणी पार पडली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद १ ऑक्टोबर रोडी शिर्डी विमानतळाचं उद्घाटन करणार आहेत. याचवेळी राष्ट्रपती साई बाबा समाधी महोत्सवालाही प्रारंभ करतील.


यानंतर देशभरातील साईभक्त या सेवेचा लाभ घेऊ शकतील. शर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी जवळपास दररोज लाखोंच्या संख्येत साईभक्त दाखल होतात. आत्तापर्यंत इथं पोहचण्यासाठी केवळ रस्ता आणि रेल्वे असे दोन मार्ग होते... परंतु, भक्तांसाठी आता तिसरा पर्यायही खुला होतोय.