कोल्हापूर ते तिरुपती विमानसेवा सुरू, पंधरवड्याचे बुकींगही फुल्ल
पुढील पंधरा दिवसांचे बुकिंगही फुल्ल झाले आहे.
कोल्हापूर : कोल्हापुरातून तिरुपतीला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर आहे. कोल्हापूर ते तिरुपती आणि तिरुपतीहून कोल्हापूर अशी विमानसेवा सुरू झाली आहे. त्यामुळे कोल्हापुरच्या भाविकांना थेट तिरुपतीचे दर्शन होणार आहे. गेले काही वर्षांपासून या प्रस्तावावर विचार सुरू होता. अखेर तिरुपती आम्हाला पावल्याची भावना भाविकांमध्ये आहे. याचीच प्रचिती प्रवाशांनी विमानसेवेच्या पहिल्या दिवसाचे बुकिंग फुल्ल करुन दिली आहे. शिवाय पुढील पंधरा दिवसांचे बुकिंगही फुल्ल झाले आहे. कोल्हापुरातून त्याचबरोबर इतर जिल्ह्यातून तिरुपतीला जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे.
प्रथा
तिरुपती बालाजीचे दर्शन घेतल्यानंतर करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनाला येण्याची प्रथा आहे. त्यामुळे ही विमानसेवा व्हावी अशी गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी होती. ही मागणी अखेर पूर्ण झाली आहे.
दररोज सकाळी ९ वाजून ४५ मिनिटांनी कोल्हापुरातून टेक ऑफ होईल तर ११ वाजून ४० मिनिटांनी तिरुपतीमध्ये लँडिंग होईल. त्यामुळे नागरिकांचा वेळही वाचणार आहे.