कथा सिंधुदुर्गातील तरंगत्या दगडाची
तुम्ही कधी पाण्यात तरंगणारा दगड पाहिलात का ? नाही ना ? दगड पाण्यात कसा तरंगणार हा प्रश्न तुम्हाला पडलाही असेल. पण सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणमध्ये हे अप्रुप पहायला मिळतोय. थोडा थोडका नव्हे तर चक्क दोन किलो वजनाचा हा दगड पाण्यावर तरंगतोय.. चला तर पाहूयात या पाण्यावर तरंगणाऱ्या या दगडाची किमया.
विकास गावकर, झी मिडिया, सिंधुदुर्ग: तुम्ही कधी पाण्यात तरंगणारा दगड पाहिलात का ? नाही ना ? दगड पाण्यात कसा तरंगणार हा प्रश्न तुम्हाला पडलाही असेल. पण सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणमध्ये हे अप्रुप पहायला मिळतोय. थोडा थोडका नव्हे तर चक्क दोन किलो वजनाचा हा दगड पाण्यावर तरंगतोय.. चला तर पाहूयात या पाण्यावर तरंगणाऱ्या या दगडाची किमया.
मालवण म्हटल कि डोळ्यासमोर येतात ते स्वच्या आणि नितळ समुद्र किनारे. हे स्वच्छ नितळ समुद्र किनारे पाहायला नेहमीच गर्दी होत असते. या समुद्रकिनाऱ्यांच्या दिमतीला तुम्हाला मालवण मध्ये आणखी एक किमया पहायला मिळू शकते. मालवण मधील संग्राहक उदय रोगे यांना मालवण मध्ये एक किमयागार दगड पहायला मिळालाय. त्यांनी तो आपल्या संग्राहलयात ठेवलाय. अस सांगितल जात की रामायणात समुद्रावर दगडांचा वापर करुन रामसेतू बांधला गेलाते दगड पाण्यावर तरंगणारे होते. पाण्यावर तरंगणारे दगड असतात याला या घटनेने पुष्टी मिळतेय.
मालवण मधील उदय रोगे यांच्या संग्रहालयात अनेक दुर्मिळ गोष्टी आहेत. पण सर्वांचे लक्ष वेधून घेतो तो हा अनोखा दगड.. उदय रोगे यांना मालवण समुद्र किनाऱ्यावर फिरत असताना काही दिवसांपूर्वी हा दगड सापडला होता. आता प्रदर्शनात ठेवल्याने लोकांना या दगडाबाबत समजले, आणि सिंधुदुर्गात हा औत्स्तुक्याचा विषय ठरला आहे.
दक्षिण भारताबरोबरच श्रीलंका आणि जपान याभागात अशा प्रकारचे दगड आढळतात. सुमारे २ किलो वजनाचा व एक फुट लांबीचा हा दगड असून पाण्यावर तरंगणारा हा दगड पाहण्यासाठी नागरिकांबरोबरच पर्यटकांची ही मोठी गर्दी होत आहे.
मालवणचा पर्यटन बहरत असताना कुतूहलाचा विषय बनलेल्या दगडाने पर्यटकांना एक वेगळी अनुभूती मिळत आहे हे नक्की आणि सहाजिकच पर्यटकांची पाऊलेही हा दगड पाहायला वळताहेत.