बीड : जिल्ह्यात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसामुळे बिंदुसरा नदीला पूर आलाय. या पुरात नदीवरील पर्यायी पूल वाहून गेला आहे. त्यामुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा झालाय. त्यामुळे बीड-सोलापूर, बीड-नांदेड वाहतूक वळविण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आष्टी, पाटोदा, बीड या तालुक्यात रविवारी दिवसभर आणि रात्रीतून झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्या नाल्याना पूर आला आहे. आष्टी तालुक्यातील देवळाली गावात पाणी शिरले. तर बीड तालुक्यातील डोकेवाडा साठवण तलाव ओव्हरफ्लो झाला असून बिंदुसरा धरणं भरले आहे.


मांजरसुबा, पाली, कोळगाव, कपिलधार या भागात मुसळधार पाऊस झाल्याने नदीला पूर आलाय. आष्टी तालुक्यातील देवळाली पानांची गावात पुराचं पाणी शिरल्यामुळे गावातल्या अनेकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.


पुरामुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेलीय. बेलखंडी पाटोदा इथली एक महिला बिंदुसरा नदीच्या पूरात वाहून गेली. अन्नपूर्णा माने नावाची ही महिला शेतातून परतत असताना पुरात वाहून गेलीय.