Maharashtra Rain : संभाव्य महापूराच्या पार्श्वभूमीवर सांगली आणि कोल्हापूर प्रशासनाला कायदेशीर नोटीस बजावण्यात आली. कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीकडून ही नोटीस जिल्हाधिकारी आणि पाटबंधारे अधिका-यांना पाठवण्यात आलीय.  महापूर आल्यास प्रशासन जबाबदार राहिल असं यात नमूद केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्नाटकच्या धरणात बेकायदा पाणीसाठा केला जात आत आहे. यामुळे सांगली आणि कोल्हापूरला महापूराचा धोका निर्माण झाला आहे.  संभाव्य महापूराच्या पार्श्वभूमीवर सांगली आणि कोल्हापूर प्रशासनाला कायदेशीर नोटीस बाजवण्यात आली आहे.  महापूराचा धोका लक्षात घेता प्रशासन देखील अलर्ट मोडवर आले आहे. 


कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीकडून जिल्हाधिकारी आणि पाटबंधारे अधिकाऱ्यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे.  सांगली आणि कोल्हापूरला महापूर आल्यास प्रशासन जबाबदार राहिला असे नोटीसी मधून स्पष्ट करण्यात आले आहे.  कर्नाटक सरकारकडून अलमट्टी धरण आणि हिप्परगी बॅरेज मध्ये करण्यात येत असलेल्या बेकायदा पाणी साठ्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. 


केंद्रीय जल आयोगाच्या तत्वानुसार 15 जुलै ते 15 ऑगस्ट पर्यंत पाणी पातळीवर नियंत्रण न ठेवल्यास सांगली व कोल्हापूरला महापूराचा धोका असल्याचा इशारा देण्यात आला आहे. तर,  येत्या 7 दिवसात कोल्हापूर आणि सांगली प्रशासनाकडून कर्नाटक सरकार बरोबर पाणी सोडण्याबाबत समन्वय न झाल्यास जनहित याचिका दाखल करण्याचाही इशारा देण्यात आला आहे. 


सांगलीसह परिसरात पाऊसाची संततधार, चांदोली धरण पाणीलोट क्षेत्रात अतिवृष्टी


सांगली आणि शिराळा तालुक्यासह आणि जिल्ह्याच्या अनेक भागात सकाळपासून पावसाचे संततधार सुरू आहे. सुशिता सांगली शहर परिसरामध्ये गेल्या तीन तासापासून संततधार पाऊस पडत आहे. त्यामुळे शहरातलं जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. तर, दुसऱ्या बाजूला शिराळा तालुक्यातल्या चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात देखील संततधार पाऊस पडत असून त्या ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 53 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे चांदोली धरणातला पाणीसाठ्यात वाढ झाली असून चांदोली धरण 53% इतकं भरलं आहे.