मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांआधी कोकण (Konkan) आणि पश्चिम महाराष्ट्रात (Westran Flood) महापूर आला. या प्रलयकारी महापुराचा कोकणातील महाड (Mahad) आणि पश्चिम महाराष्ट्रातील सांगली (Sangali) आणि कोल्हापूर (Kolhapur) अशा एकूण 21 जिल्ह्यांना मोठा फटका बसला. या पुरामुळे अनेकाचं संसार उद्धवस्त झाले. अनेकांनी आपले स्वकीय गमावले. वैयक्तिक नुकसानासह या पुरामुळे सार्वजनिक संपत्तीचंही नुकसान झालं. पुरामुळे काही ठिकाणी भूस्सखलन झाले, रस्ते खचले. काही ठिकाणी विजेचे खांबे कोसळले. या पुरामुळे सरकारी मालमत्तांचे (Governmemt Property) नुकसान झालेच. तसेच शेतीचंही मोठं नुकसान झालं. (Floods hit 21 districts in Maharashtra with chiplun mahad and westran maharashtra causing loss of thousands of crores of rupees)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

3 ते 4 हजार कोटींचे नुकसान


प्राथमिक अंदाजानुसार, सरकारी मालमत्तांचे 3 ते 4 हजार कोटींचे नुकसान झाल्याची माहिती आहे. तसेच तब्बल 3.38 लाख हेक्टरवरील शेतीचंही नुकसान झालंय. फक्त अतिवृष्टी आणि दरडींमुळे रस्त्यांचं तब्बल 1 हजार 800 कोटींचं नुकसान झालंय.



कोकणात किती नुकसान?


महापुरामुळे फक्त कोकणात रस्ते आणि पुलांचं 700 कोटींचं नुकसान झालंय. याबाबतची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री अशोक चव्हाणांनी माहिती दिली. कोकणानंतर पुणे, अमरावती, औरंगाबाद, नागपूर आणि नाशिक विभागात नुकसान झालंय. इथील एकूण 290 रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले होते. 469 रस्त्यांवरील वाहतूक खंडित झाली होती. तर १४० पूल आणि  मोऱ्या पाण्याखाली गेले होते. 


दरम्यान अजूनही बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरू असून आहे. तर ज्या भागात पाऊस ओसरला आहे, तिथे मदतकार्य आणि साफसफाई करण्याचे काम सुरुय. राज्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या नुकसानीबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चव्हाण यांचा संपर्क झाला आहे.