रायगड : रायगडच्या समुद्रकिनारी फेसासारखे गोळे आढळून आलेत. हे गोळे हवेतून उडत आले त्यानंतर अचानक गायब झाले. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होतंय. मुरूड आणि नांदगावच्या समुद्रकिनारी शनिवारी हे फेसासारखे गोळे दिसून आले. लहान मुलं या गोळयांसोबत खेळतही होते. मात्र काही वेळातच हे गोळे नाहीसे झाले. एव्हढे मोठे फेसाचे गोळे समुद्रकिनारी आलेच कसे ? याविषयी गूढ निर्माण झालंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फेसाच्या गोळ्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतोय. नेमका हा प्रकार आहे तरी काय यावरूनही तर्क वितर्क लढवले जातायेत. 


समुद्रातील नैसर्गिक हालचालींचा हा परिणाम असावा असं सांगितलं जातंय. किनारपट्टीवर जे खडक असतात त्यातील कार्बनीक पदार्थाना भेदून त्यातील जी द्रव्ये बाहेर येत असतात त्यापासून हे असे सी फोम तयार होतात. अलीकडच्या काळात झालेल्या 2 चक्रीवादळात जे समुद्र मंथन झाले त्याचा हा परिणाम असावा, असा दावा नांदगाव येथील शिक्षक आणि प्रत्यक्षदर्शी उदय खोत यांनी केलाय.