नागपूर : राज्याच्या उपराधानीत शुक्रवारी एकाच दिवशी कोरोनामुळं पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर १२५ कोरोनाबाधितांची भर पडली आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंत वाढत आहे..मिशन बिगीन अगेन अंतर्गत लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आल्यानंतर  शासनाच्या दिशानिर्देशानुसार सर्व नियमांचे पालन करावे  या अटीवर दैनंदिन कामकाज सुरू करण्याची सवलत देण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 नागरिकांना प्रशासनातर्फे वेळोवेळी आवाहन करण्यात आले. मात्र, नागरिक नियम पाळत नसल्याचे झपाट्याने वाढणारी रुग्णसंख्या आणि  वाढत्या मृत्युसंख्येवरून दिसू लागले आहे. त्यामुळे आता नियम तोडणाऱ्यांवर तात्काळ प्रभावाने साथरोग नियंत्रण कायद्यांतर्गत सरळ गुन्हे दाखल करण्यात यावे, असे निर्देश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहे.


नागपुरात आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या २७७४ पर्यंत पोहचली आहे.तर मृतांची संख्या ४५  झाली आहे. तर १७३३ जण कोरोनामुक्त झाले आहे.पण कोरोना बाधितांची झपाट्यांनं वाढणारी संख्या चिंतेत भर टाकणारी ठरत आहे. मिशन बिगीन अगेन सुरू होण्यापूर्वी नागपुर शहरात ४०० च्या जवळपास कोविड रुग्णसंख्या होती.  मात्र १६ जुलैपर्यंत ती २१००च्या घरात गेली. म्हणजेच दीड महिन्यात १७०० रुग्णवाढ झाली. याचाच अर्थ नागरिकांनानियमांचे पालन करण्याचे वेळोवेळी आवाहन करण्यात येत असूनही ते केले जात नाही.  


ताकीद देऊनही सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यात येत नाही. मास्कचा वापर केला जात नाही. दुकानांसाठी जे नियम आखून दिले आहेत, त्याचेही उल्लंघन होत आहे. नाईट कर्फ्यूची ही गांभीर्यपूर्वक अंमलबजावणी करण्याचे आवाहन त्यांनी पोलीस  विभागास केले. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यापुढे मार्केट परिसरात नियमांचे काटेकोरपणे  पालन व्हायलाच हवे, असे म्हणत आजपर्यंत नागरिकांवर प्रशासनाने ही जबाबदारी टाकली होती. आता नागरिक नियमांकडे दुर्लक्ष करीत  असतील तर त्यांच्यावर साथरोग नियंत्रण कायद्याखाली ‘ऑन दि स्पॉट’ गुन्हा दाखल करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. 


यासाठी मनपा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाने आजपासूनच "ॲक्टिव्ह मोड"वर यावे असेही  त्यांनी सांगीतले. नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात यावी या विषयावर  नागपुरातील मनपाच्या दहाही झोनचे सहायक आयुक्त आणि पोलिस  प्रशासनातील अतिरिक्त आयुक्तांसह सर्व झोनचे उपायुक्त यांची संयुक्त बैठक मनपा मुख्यालयातील आयुक्त कार्यालयात आयोजित  करण्यात आली होती. बैठकीला मनपा आयुक्त तुकाराम मुंढे,यांसह महापालिकेतील सर्व अधिकारी तसेच पोलीस अधिकारी उपस्थित होते.


दंडाची रक्कम वाढणार


बाजार परिसरात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे दंड आकारण्यात येत होता. आता ही कारवाई अधिक कडक करण्यात येणार आहे. नवा आदेश काढून ही रक्कम वाढवणार असल्याची माहिती मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यावेळी बैठकीत दिली. 


रात्रीच्या संचारबंदीचीही कडक 


शासनाचे दिशानिर्देश आणि स्थानिक पातळीवर काढलेल्या आदेशानुसार रात्री ९ ते सकाळी ५  वाजतापर्यंत शहरात संचारबंदी राहील, असे नमूद आहे. रात्री उशिरापर्यंत नागरिकांचे आवागमन सुरु आहे. यासाठी पोलिसांनी नाकाबंदी करावी, विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करावी, असे निर्देशही मनपा आयुक्तांनी दिले.