मुंबई : कोकणात जाण्यासाठी सोडण्यात येणाऱ्या गणपती विशेष गाड्यांच्या आरक्षणाला प्रतिसाद वाढू लागला आहे. गणेशोत्सवाला 10 सप्टेंबरपासून सुरुवात होत  आहे. मुंबई परिसरातून जाणाऱ्या 1 हजार 15 जादा गाड्यांपैकी 340 बस आरक्षित झाल्या आहेत. यात गट आरक्षणाच्या गाड्याही आहेत. गणेशोत्सवानिमित्त एसटीच्या  जादा गाड्यांबरोबरच मध्य रेल्वेकडूनही 40 किंवा त्यापेक्षा जादा गाड्या सोडण्याची तयारी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 महामंडळाने मुंबई, ठाणे, पालघरमधून जाण्यासाठी व कोकणातून येण्यासाठी 2200 जादा बसगाड्यांची घोषणा केली. या बस 4 सप्टेंबरपासून सुटतील. 16 जुलैपासून  जाण्याचे व परतीचेही आरक्षण सुरू झाले आहे. 
मुंबई, ठाणे व पालघरअंतर्गत  विविध आगारांतून सुटणाऱ्या प्रथम एक हजार १५ जादा गाड्या आरक्षणासाठी उपलब्ध  करण्यात आल्या आहेत. त्यातील गट आरक्षणाच्या 100 बस आणि स्वतंत्र आरक्षणाच्या 240 गाड्या आरक्षित झाल्या आहेत.


खासगी बस भाडेवाढ


यंदा झालेल्या इंधनदरवाढीमुळे गणेशोत्सवानिमित्त कोकणात खासगी टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्सने जाणाऱ्यांच्या खिशाला काहीशी कात्रीही लागू शकते. मुंबई बस मालक  संघटनेचे सचिव हर्ष कोटक यांनी गेल्या वर्षी याच काळात डिझेलचा दर प्रति लिटर 70 रुपये होता. 
तोच आता 100 रुपयांपर्यंत गेला. इंधन दरवाढ ही परवडणारी नाही.  तसेच गेल्या वर्षीही गणेशोत्सवात उत्पन्न नव्हते. त्यामुळे यंदा गणेशोत्सवकाळात खासगी बसचे भाडे 20 टक्क्यांनी वाढविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


आणखी 40 जादा रेल्वेगाडय़ा गणेशोत्सवानिमित्त मध्य रेल्वेने 72 रेल्वेगाडय़ा सोडण्याची घोषणा के ली असून त्याच्या आरक्षणाला  प्रतिसाद मिळाला आहे. आणखी  40 किंवा त्यापेक्षा जादा गाडय़ा सोडण्याचाही निर्णय घेतला असून लवकरच त्याची घोषणा होईल, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.