मुंबई : दाउद इब्राहिम हा देशाचा शत्रू नंबर एक आहे. मुंबईचा तो गुन्हेगार आहे. त्‍याची दिवंगत बहिण हसीना पारकर आणि त्‍याचा भाऊ यांना पुढे करून तो मुंबईतले त्‍याचे रियल इस्‍टेटचे व्यवहार सांभाळायचा. याच हसीना आपासोबत मंत्री नवाब मलिक यांनी जमिनीचे व्यवहार केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शहावली खान, सलीम पटेल हे मुंबई बाँबस्‍फोटात शिक्षा सुनावण्यात आलेले गुन्हेगार होते. हसीना आपाचे फ्रंटमॅन होते. कुर्ला एलबीएस रोडवरील अतिशय महागडी जमीन जिची किंमत दोन हजार रूपये चौरस फुट होती. ती २५ रूपये भावाने खरेदी केली. मुंबईत उकीरडयाची जागा तरी २५ रूपयाने मिळते का असा सवाल फडणवीस यांनी केला. 


२००९ साली क्राईम ब्रॅच रेकार्ड पाहिला तर हसिना पारकरने सलिम पटेल यांच्या नावाने ६०० कोटी रुपयांची प्राॅपर्टी घेतली. स्वच्छ प्रतिमेचे आर. आर. आबा यांच्यासोबत बसले म्हणून त्यांच्यावर टिका झाली. पण, ज्याचा थेट संबंध आहे त्याच्याशी तुम्ही व्यवहार कराल का? तिघांचे एका खाली एक फोटो आहेत.


शहावली खान आता जेलमध्ये आहे. त्याची तिथे जाऊन जबानी घेतली. ट्रॅव्हल एजंटने मान्य केलं की ते या ठिकाणी येत होते त्यांच्या बैठका झाल्या. नवाब मलिक यांचे अजून सौदे आहेत. त्यात मनी लांन्ड्रींग आहे पण टेरर फंड आहे का याची चौकशी होणे गरजेचे आहे.


नवाब मलिक यांना मंत्रीपदावर राहण्याचा मुळीच अधिकार नाही. मलिक यांचा राजीनामा तात्‍काळ घेतला गेला पाहिजे. केवळ विरोधी पक्ष राजीनामा मागतो म्‍हणून घ्‍यायचा नाही असा हा प्रकार नाही. मी विरोधी पक्षनेता झाल्‍यापासून आतापर्यंत एकाही मंत्र्यांचा किंवा मुख्यमंत्री यांचा राजीनामा कधीच मागितलेला नाही. हा मुंबईच्या नागरिकांना न्याय देण्यासाठी राजीनामा हवा आहे असेही देवेंद्र फडणवीस म्‍हणाले.


मलिक यांचा राजीनामा घेतला नाही. सरकार कोणाला वाचवत आहे. तुमचा कुणाला पाठिंबा आहे? एकदा मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री सगळे एकत्र बसा, शांत विचार करा, मुंबई अशांत झाली तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल त्यांनी केला.