मुंबई : महत्त्वाचे ओळखपत्र असलेले पॅनकार्ड महत्त्वाच्या व्य़वहारांसाठी आवश्यक असते. पॅनकार्डचे महत्त्व इतके वाढले असून ते नसल्यास तुमची अनेक कामे अडू  शकतात. त्यामुळे जर पॅनकार्ड गहाळ झाले असेल किंवा तुम्ही काढलेच नसेल तर ते नक्की काढून घ्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कार खरेदी 
कार खरेदी मध्ये आर्थिक व्यवहारही मोठा असल्याने त्यावेळेस तुम्हाला पॅनकार्डची गरज भासू शकते. खरेदीच्या प्रक्रियेतील फॉर्म भरण्यासाठी तुमच्याकडे पॅनकार्ड असणे आवश्यक असते. याशिवाय तुम्ही कार खरेदी आणि विक्री करु शकत नाही.


हॉटेलचे बिल 
तुम्ही कुठे बाहेरगावी फिरायला गेलात किंवा एखाद्या पार्टीत तुमचे  बिल ५० हजारांच्या वर गेले. तर अशावेळी संबंधित हॉटेल व्यवस्थापनाकडून तुमच्या पॅनकार्ड क्रमांकाची मागणी होऊ शकते. त्यामुळे हॉटेलशी मोठा व्यवहार करायचा असल्यास पॅनकार्ड जवळ ठेवणे आवश्यक आहे. 


बॅंक खाते
बँकेत नवे खाते उघडताना तुमच्याकडे पॅनकार्ड असणे अतिशय आवश्यक असते. याशिवाय बॅंकेत ५० हजार किंवा त्याहून जास्त रक्कम एकावेळी भरायची असल्यास बॅंकेकडे पॅनकार्डची माहिती द्यावी लागते. 


सिमकार्ड खरेदी 
तुम्ही नवीन सिमकार्ड घेण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी तुमच्याकडे पॅनकार्ड असणे बंधनकारक आहे. मोबाईलच्या व्यवहारातील सुरक्षा वाढण्यासाठी तुमचा पॅनकार्ड क्रमांक आवश्यक असतो. पॅनकार्डचे डिटेल्स तुम्हाला सिमकार्ड घेण्याच्या फॉर्ममध्ये भरावे लागतात.