संभाजीनगरमध्ये वन संरक्षक परीक्षेचा पेपर फुटला, आदल्या दिवशीच प्रश्नांचे 110 फोटो मोबाइलवर
Forests Exam Paper Leaked: नागपूरहून छत्रपती संभाजीनगरच्या केम्ब्रिज परिसरातील सुंदरवाडी परीसरातील शिवराणा करिअर सेंटरवर बसलेल्या चार जणांकडे प्रश्नाचे ११० फोटो फोनवर आले होते, या प्रश्नांची उत्तरे तयार करून एका उमेदवाराला पाठवण्याची प्रक्रिया या सेंटर वर सुरू होती.
Forests Exam Paper Leaked: राज्यभरातील विविध परीक्षा केंद्रावर वन विभागाच्या वन संरक्षक परीक्षेची परीक्षा घेण्यात आली. दरम्यान संभाजीनगर येथील परीक्षा केंद्रावर पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे परीक्षा देणाऱ्या काही विद्यार्थ्यांना त्यांच्या मोबाईलवर आदल्या दिवशीच प्रश्नपत्रिका मिळाल्याचे उघड झाले आहे. मंगळवारी घेण्यात आलेल्या पेपरमधील प्रश्न विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर सोमवारीच आले होते. 5 जणाच्या मोबाइलवर प्रश्नांचे110 फोटो आढळल्याचे पोलीस तपासाता उघड झाले आहे. नागपूरहून हे फोटो विद्यार्थ्यांना पाठविण्यात आल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. दरम्यान संभाजीनगर पोलिसांनी याप्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल केला असून 1 आरोपीला अटक केली आहे.
नागपूरहून छत्रपती संभाजीनगरच्या केम्ब्रिज परिसरातील सुंदरवाडी परीसरातील शिवराणा करिअर सेंटरवर बसलेल्या चार जणांकडे प्रश्नाचे 110 फोटो फोनवर आले होते, या प्रश्नांची उत्तरे तयार करून एका उमेदवाराला पाठवण्याची प्रक्रिया या सेंटर वर सुरू होती. मात्र एमआयडीसी पोलिसांनी याची कुणकुण लागली आणि सोमवारी रात्री छापा मारून संशयितांना ताब्यात घेतले.
विनोद डोभाळ असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सेंटरचा चालक सचिन गोमलाडू आणि लोधवाड पळून गेल्याचे सांगण्यात येत आहे.
प्रत्येक प्रश्नासाठी विद्यार्थ्यांकडून 10 लाख रुपये उकळले जात होते. तसेच प्रश्नांची उत्तरे पाठवणाऱ्या पाच जणांना प्रत्येकी 50 हजार रुपये दिले जाणार होते, अशीही माहिती समोर आली आहे.
वनरक्षकच्या 2138 पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे.1 ऑगस्टला पहिला पेपर होता. मात्र, आदल्या दिवशी पेपर फुटल्याची माहिती एमआयडीसी सिडको पोलिसांना मिळाली. याबाबत पोलिसांनी छापा सत्र सुरु केले. यावेळी एका अकॅडमीत काही उमेदवारांचे बैठक क्रमांक सापडले. या प्रकरणी अजून काही धागेदोरे आढळतात का? याचा पोलीस तपास करत आहेत. याप्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.
1 मिनिट उशीर झाल्याने विद्यार्थ्यांना ठेवले केंद्राबाहेर
महाराष्ट्र सरकारच्या वनविभाग परीक्षेत मोठा गोंधळ पाहायला मिळाला. अवघे 1 मिनिट उशीरा आलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा वर्गातून बाहेर ठेवण्याचा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. पुणे रामटेकडी येथील सुयोग हब परीक्षा केंद्रावर 25 ते 30 विद्यार्थ्यांना उशीरा आल्याने बाहेर ठेवले असून या विद्यार्थ्यांची पुनरपरीक्षा घ्यावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे.
आज रामटेकडी पुणे या ठिकाणी वन विभागाच्या पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षा सुरु होती. एक मिनिट उशीर झाला म्हणून पंचवीस ते तीस विद्यार्थ्यांना बाहेर काढले गेले. या विद्यार्थ्यांनी रडत रडत पुण्यातील मराठा क्रांती संघटनेशी संपर्क साधला.