पणजी, गोवा : Vasantrao Naik's Birth Anniversary : माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची आज जयंती गोव्यात साजरी करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. नाईक यांना राज्याच्या कृषी क्रांतीचे आधारस्तंभ मानले जाते. शिंदे यांनी राज्यातील शेतकरी बांधवांनाही कृषी दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे जनक, प्रगतिशील शेतकरी, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जयंतीदिन संपूर्ण राज्यात कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. आज राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा दिवस गोव्यात साजरा करण्यात आला. यावेळी बंड केलेले शिवसेनेचे सर्व आमदार आणि  
अपक्ष आमदार हे देखील उपस्थित होते. कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला वंदन करुन शिंदे आणि सर्व आमदार महोदयांनी त्यांना आदरांजली अर्पण केली. 


शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या आशीर्वादाने राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार पुन्हा एकदा सत्तेत आले आहे. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भरभराटीसाठी हे सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी बोलताना शिंदे यांनी दिली.