Prithviraj Chavan on Jaydeep Apte: छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा साकारणा-या शिल्पकारावरुन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी खळबळजनक आरोप केला आहे. शिल्पकार जयदीप आपटेला कुणी पळवलं? अशी विचारणा पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. झी २४ तासच्या 'टू द पॉईंट' मुलाखतीत पृथ्वीराज चव्हाणांनी शिवरायांच्या पुतळ्याच्या शिल्पकाराबाबत हा मोठा आरोप केला आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा साकारण्यासाठी जयदीप आपटेने 3 वर्ष मागितली होती. मात्र त्याला सहाच महिने का देण्यात आले? असा सवालही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. 


पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हणाले?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"कोणाला टेंडर दिलं? टेंडर काढलं होतं का? कोणत्या शिल्पकाराल दिलं होतं? त्याला काय अनुभव होता? त्याने थ्रीडी प्रिटिंग मशीन वापरुन तुकड्या तुकड्यात पुतळा तयार केला. 18 थ्रीडी प्रिटिंग मशीन आणल्या आणि छपाई केली. हे कधी झालं होतं का? अशाप्रकारे मोठा पुतळा तयार केलं जात असल्याचं आम्ही कधी ऐकलं नाही," असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. 
 
"जे जे स्कूल ऑफ आर्टचे मिश्रा यांनी सांगितलं की, आम्ही सहा फुटीच्या उंचीला मान्यता दिली होती, मग 18 फुटाचा कोणी केला? हे सगळं बाहेर आलं पाहिजे. पण येणार नाही कारण सरकारला शेकेल यासाठी सगळं दाबण्यात आलं आहे. आर्किटेक्ट कोणी पळवला?," अशी विचारणा पृथ्वीराज चव्हाणांनी केली. 


शिल्पकार जयदीप आपटेला पळवलं असा तुमचा आरोप आहे का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, "नक्कीच...विरोधी पक्षाने तर नाही पळवलं. तो कुठे गेला? त्याला बोलवा, त्याची मुलाखत घ्या. त्याला त्याचा बचाव करु द्या. त्याचा काही दोष होता का? पुतळ्याला तीन वर्षं लागतील असं त्याने सांगितलं होतं. मोदींना उद्घाटन करायचं आहे त्यामुळे सहा महिन्यात करा असं कोणी सांगितलं? 18 थ्रीडी पेटिंग मशीन वापरल्याचं त्याने स्वत: सांगितलं होतं".


'संपूर्ण राज्य मंत्रिमंडळाने राजीनामा द्यावा'


जर भ्रष्टाचार झाला असेल तर संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. "या प्रकरणात भ्रष्टाचार झाला का? शिल्पकार मुख्यमंत्र्यांच्या जवळचा माणूस होता का? त्याने एकही मोठा पुतळा केला नव्हता. त्याच्यावर पुतळा लवकर करण्यासाठी दबाव टाकला का? या सगळ्या गोष्टी समोर आल्या पाहिजेत. जर भ्रष्टाचार झाला असेल तर संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा घेतला पाहिजे. फक्त एकाचा घेऊन काय होणार? जर खरंच नौदलाची जबाबदारी असेल तर त्यांचा राजकीय बॉस राजनाथ सिंग आहेत. एखाद्या नेव्हीच्या कॅप्टन किंवा लेफ्टनंटवर ते शेकवू नका. भारतीय सैन्याचं मनोधर्य खच्चीकरण करु नका. जबाबदारी कोणीतरी स्विकारावी लागेल," असंही पृथ्वीराज सिंग म्हणाले आहेत.