Anil Deshmukh | अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ, पुन्हा एकदा EDचा समन्स
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ईडीने (Enforcement Directorate) पुन्हा एकदा त्यांना समन्स बजावला आहे.
मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना (Anil Deshmukh) ईडीने (Enforcement Directorate) पुन्हा एकदा समन्स बजावला आहे. अनिल देशमुखांसह त्यांचा मुलगा ऋषिकेशलाही (Hrishikesh Deshmukh) समन्स देण्यात आलं आहे. यानुसार या पितापुत्रांना 2 ऑगस्टला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी वसुलीचा आरोप केला होता. त्यानंतर अनिल देशमुख ईडीच्या रडारवर आहेत. (Former Maharashtra Home Minister Anil Deshmukh and his son Hrishikesh Deshmukh summoned by Enforcement Directorate for money laundering case)
याआधी ईडीकडून 3 वेळा समन्स देशमुखांना समन्स बजावण्यात आला. मात्र देशमुखांनी तब्येतीच कारण देत चौकशीसाठी हजर राहता न येण्याचं कारण दिलं होतं.
न्यायालयाकडून दिलासा नाही...
आपल्याला ईडीकडून होणारी अटक टाळण्यासाठी देशमुखांनी न्यायालयात धाव घेतली. त्यांनी याचिका दाखल केली होती. दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. सुनावणीतून देशमुखांना कोणताही दिलासा मिळाला नाही. त्यामुळे आता देशमुखांना ईडीसमोर चौकशीसाठी हजर रहावं लागणार आहे.
अनिल देशमुखांची संपत्ती जप्त
दरम्यना याआधी ईडीने अनिल देशमुखांची संपत्ती जप्त करत दणका दिला आहे. त्यांच्यावरळीमधील सुखदा या इमारतीमधील डुप्लेक्स फ्लॅटपैकी एक फ्लॅट जप्त करण्यात आला. जप्त केला गेलाला फ्लॅट देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख यांच्या नावावर आहे. या फ्लॅटची किंमत ही 1 कोटी 54 लाख इतकी आहे. इतकच नाही तर रायगड जिल्ह्यातील 2 कोटी 67 लाखांची जमीनही जप्त करण्यात आली आहे.