कोल्हापूर : Dr. N D Patil : शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते विचारवंत प्राध्यापक डॉ. एन. डी. पाटील यांचे पार्थिवर हॉस्पिटल बाहेर काढण्यात आले असून शाहू कॉलेजमध्ये ठेवले जाणार आहे. थोड्यावेळासाठी ठेवल्यानंतर तिथे फुलांनी सजविण्यात येणार असून त्यानंतर अंत्यदर्शनासाठी मैदानावरील मांडवात ठेवण्यात येणार आहे. त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. (Dr. N D Patil body will be laid to For a final visit at Shahu College Ground, Kolhapur)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्येष्ठ नेते विचारवंत प्राध्यापक डॉ. एन. डी. पाटील यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले. आयुष्यभर कष्टकरी, शेतकरी, आणि सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांसाठी रस्त्यावरची लढाई लढणाऱ्या या भिष्माचाऱ्यावर आज  कोल्हापुरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. सध्या एन. डी.  पाटील यांचे पार्थिव  कोल्हापुरातील ॲपल सरस्वती हॉस्पिटलमध्ये होते. सकाळी 8 वाजता हे पार्थिव बाहेर काढल् जाणार आहे. त्यानंतर रयत शिक्षण संस्थेच्या शाहू कॉलेज वर हे पार्थिव आणण्यात येईल. 


या कॉलेजच्या पटांगणावर एन. डी. पाटील यांचे पार्थिव सकाळी 8:30 ते दुपारी 1 पर्यत अंत्यदर्शनासाठी ठेवले जाईल. त्यानंतर कसबा बावडा स्मशानभूमीत कोरोनाच्या  नियमाच पालन करत अवघ्या 20 लोकांच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. 


कालच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे एन डी पाटील यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी कोल्हापुरात दाखल झालेत. तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री सतेज पाटील, विश्वजित पाटील यांनी देखील एन डी यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतलं आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह अन्य मान्यवर देखील कोल्हापुरात दाखल होऊन जेष्ठ नेते एन डी पाटील याना श्रद्धांजली वाहणार आहेत.