रत्नागिरी : शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री अनिल परब (Shiv Sena leader Anil Parab) यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. त्यांचा वादग्रस्त रिसॉर्ट लवकरच जमीनदोस्त (demolishing resort) होणार आहे. मुरुडमधील वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक झाली. जिल्हास्तरीय कोस्टल झोन मॉनिटरिंगची कमिटीची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्र शासनाच्या आदेशाप्रमाणे आणि शासकीय पद्धतीने पाडण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू झाली असून लवकरच कारवाई होईल. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ बी एन पाटील यांनी बैठकीनंतर दिली.


सी कॉन आणि साई रिसॉर्ट (Sai Resort) पाडण्यासंदर्भात आराखडा तयार करण्यात आला आहे. रिसॉर्ट पाडसंदर्भात बांधकाम विभागाला नियोजन करण्याचे आदेश देण्यात आल्याचं जिल्हाधिकारी यांनी म्हटलं आहे.


केंद्र शासनाने घालून दिलेल्या विहित नियमानुसार कारवाई होणार होणार आहे. भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी या वादग्रस्त रिसॉर्ट बाबत पाठपुरावा केला होता. या रिसॉर्टवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली होती.


अनधिकृत रिसॉर्ट पाडण्यासाठी केंद्रासह महाराष्ट्र पर्यावरण विभागानं देखील आदेश दिल्याची माहिती याआधी किरीट सोमय्या यांनी दिली होती. तसेच अनिल परब यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील किरीट सोमय्या यांनी केली होती.


अनिल परब यांनी मंत्रिपदाचा गैरवापर केल्याने त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी किरीट सोमय्या यांनी केली होती.