सोलापूर : उसाला एकरकमी एफआरपी मिळावी यासाठी आज रयत क्रांती संघटनेचे नेते (Rayat Kranti Sanghatana) सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांच्या नेतृत्वात सोलापूर (Solapur) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी सदाभाऊ खोत यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारवर खोचक टीका केली


शिवसेनेची भूमिका म्हणजे...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानसभा निवडणुकीच्या निकलानंतर शिवसेना (Shiv Sena) ठरलेलं लग्न मोडून काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीबरोबर (NCP) पळून गेली अशी टीका रयत संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केली आहे. शिवसेना - भाजपा महायुतीने  (Shiv Sena - BJP Mahayuti) लोकसभा आणि विधानसभा एकत्र लढवली, त्यामध्ये जनतेने महायुतीला आशीर्वाद ही दिला.  पण, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेने हळद एकाबरोबर आणि लग्न दुसऱ्याबरोबर अशी भूमिका घेतली. भाजपाबरोबर ठरलेल लग्न, साखरपुडा मोडून हळदीच्या अंगाने पळून गेली अन् मोकळी झाली, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे.


भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटलांच्या म्हणण्यानुसार शिवसेनेनं जर स्वतंत्र निवडणूक लढली असती तर त्यांना कळलं असतं, याआगोदरच्या विधानसभेत भाजपाने स्वतंत्र निवडणूक लढून चांगल्या जागा मिळवल्या आहेत असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.


मविआ सरकार विदूषक 


यावेळी सदाभाऊ खोत यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकाकरवरही (Mahavikas Aghadi Government) जोरदार टीका केली. राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे एक विदुषक आहे. महाराष्ट्रातील जनतेची करमणूक करण्याचं काम त्यांच्याकडून सुरू आहे असा टोलाही सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे.


सरसकट मदतीची मागणी


राज्यात अतिवृष्टीमुळे जे संकट ऊभं टाकलं आहे. त्यासाठी पंचनामे नकरता सरसकट तातडीने खरीप पिकाला 60 हजार आणि बागायती पिकाला 1 लाख रुपये प्रतिएकर अनुदान द्या अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी केली आहे.