लैलैश बारगजे, झी मीडिया, अहमदनगर : माजी मंत्री शंकरराव गडाख (Shankarroa Gadhakh) यांनी सोनईत कार्यकर्ता मेळावा घेऊन शिवसेनेसोबत (shivsena) राहून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना साथ देणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. शंकरराव गडाख नेवासा विधानसभा मतदार संघातून अपक्ष निवडून आल्यानंतर शिवसेनेला पाठिंबा दिला आणि मंत्री झाले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मेळाव्यात बोलताना शंकरराव गडाख यांनी मोठा गौप्यस्फोटही केला. शिवसेनेतील आमदारांची खदखद चार महिन्यांपूर्वी आपल्याला समजली होती असा गौप्यस्फोट गडाख यांनी केला आहे. 


आमदार नाराज होते ही वस्तुस्थिती असून राजकीय नाराजी असेल काही कामाच्या बाबतीत असेल त्या त्या वेळी उद्धव ठाकरे यांनी मिटिंग घेण्याचा प्रयन्त केला. आम्हाला सर्वाना सूचना दिल्यानंतर आम्ही देखील त्या आमदारांचे काम करण्याचा प्रयन्त केला, पण इतकी मोठी नाराजी आणि त्यातून इतका मोठी घटना होईल अशी अपेक्षा आम्हालाच नाही तर उद्धव ठाकरेंना सुद्धा नसावी पण दुर्दैवाने ते झालेले आहे असं शंकरराव गडाख यांनी स्पष्ट केलं. 


मी जरी अपक्ष म्हणून निवडून आलेलो असलो तरी मी काही सिद्धांतावरती उध्दव ठाकरे आणि शिवसेनेबरोबर आलेलो होतो. त्यानुसार मी उद्धव ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि तो अंमलात आणला असल्याचं शिवसेनेचे माजीमंत्री शंकरराव गडाख यांनी कार्यकर्ता मेळाव्यानंतर मध्येमाध्यमांशी बोलतांना सांगितलं.


शिंदे फडणवीस सरकारने ठाकरे सरकारचे अनेक निर्णय रद्द केले आहेत. मात्र जनतेच्या हिताचे निर्णय हे सरकार रद्द करणार नाही अशी अपेक्षा देखिल गडाख यांनी व्यक्त केली आहे. 


शंकरराव गडाख यांनाही शिंदे गटाकडून संपर्क झाला होता. मात्र, शंकरराव गडाख शिवसेनेसोबतच राहिले होते. त्यानंतर शंकरराव गडाख यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती.