औरंगाबाद : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठे नेते आणि माजी आमदार बी. एन. देशमुख काटीकर यांचे निधन मध्यरात्री  औरंगाबाद येथे निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते.  त्यांचे मागे मुलगा, सून दोन नातवंडे असा परिवार आहे. त्यांनी शेतकरी, कष्टकरी आणि कामगार यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यांच्या पार्थिवावर आज औरंगाबाद येथेच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ते मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती होते. बी.एन. देशमुख यांचे संपूर्ण नाव बॅ. बलभिमराव नरसिंगराव देशमुख काटीकर असे आहे. शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी राज्यसभा सदस्य अॅड. नरसिंहराव देशमुख यांचे पुत्र, माजी खासदार उध्दवराव पाटील यांचे ते भाच्चे होत. 


शेतकरी कामगार पक्षाचे नेते होते. उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात ते वकिली करत असताना राज्य विधान परिषदेवर त्यांची निवड झाली होती. नंतर त्यांची उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली होती. शेतकरी , कष्टकरी कामगार  तसेच सामाजिक प्रश्रावर त्यांनी उच्च न्यायालयात दिलेले अनेक निर्णय 'ऐतिहासिक' ठरले होते.