राष्ट्रवादीत या माजी आमदाराचा भुजबळांच्या उपस्थित प्रवेश
नांदगावचे माजी आमदार संजय पवार यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थित राष्ट्रवादीत प्रवेश केला.
नाशिक : राष्ट्रवादीने आगामी निवडणुकीची तयारी करताना माजी आमदाराला पक्षात घेऊन आघाडी घेतली आहे. नांदगावचे माजी आमदार संजय पवार यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थित राष्ट्रवादीत प्रवेश केला. (Former MLA Sanjay Pawar made a NCP entry in the presence of Chhagan Bhujbal at Yeola)
नांदगावचे माजी आमदार संजय पवार यांनी यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांच्या उपस्थितीत येवल्यामध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला. नगरपंचायत, नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रवेश केल्याने या प्रवेशाला महत्व प्राप्त झाले आहे.
संजय पवार हे 2004 ते 2009 या काळात ते शिवसेनेचे आमदार होते. माजी आमदार संजय पवार यांचा शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश झाला होता. त्यानंतर त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
आता त्यांनी पुन्हा राष्ट्रवादी प्रवेश करत आपला राजकीय प्रवास सुरु ठेवला आहे. आता आपण अखेरपर्यंत भुजबळांसोबत आणि राष्ट्रवादीतच राहणार आहोत, असे त्यांनी प्रवेशाच्यावेळी सांगितले.