शिंदे गटाच्या माजी आमदाराचे शेजाऱ्यासह भांडण; मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल
शिंदे गटाचे माजी आमदार राजेश क्षीरसागर अडचणीत आलेत. शेजाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर जाला असून व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
rajesh kshirsagar : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि शिंदे गटाचे माजी आमदार राजेश क्षीरसागर अडचणीत आलेत कारण त्यांच्यावर शेजा-यांना मारहाण केल्याचे गंभीर आरोप करण्यात आलेत. शनिवारपेठ परिसरात क्षीरसागर ज्या अपार्टमेंटमध्ये राहतात त्या शिवगंगा संकुल अपार्टमेंटमध्ये राहणा-या राजेंद्र वरपे यांनी क्षीरसागर आणि त्यांच्या मुलाविरोधात पोलिसांत तक्रार देण्यात आलीय.
क्षीरसागर आणि त्यांचे कार्यकर्ते याठिकाणी पार्ट्या करत गोंधळ घालत असल्याचा आरोप वरपे कुटुंबानं केलाय. या मारहाणीचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. मात्र, पोलीस गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप वरपे कुटुंबीयांनी केलाय.
याप्रकरणी क्षीरसागरांची प्रतिक्रिया घेण्याचा आम्ही प्रयत्न केला मात्र क्षीरसागरांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.. तर क्षीरसागरांपासून धोका असल्याचा आरोप करत पोलीस संरक्षण देण्याची मागणी वरपे कुटुंबांनी केलीय. राजेश क्षीरसागर माजी आमदार आहेत, सध्या सत्ताधारी शिंदे गटात आहेत. त्यांच्यावर मारहाण, धमकावल्याचे आरोप करण्यात आलेत. त्यामुळे सत्ताधारी नेत्याला अशा प्रकारची वर्तणूक शोभते का असा सवाल विचारला जातोय.
शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्या समर्थकावर गोळीबार
जालन्यात गजानन तौर यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना घडलीये. गजानन तौर हे शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांचे कट्टर समर्थक मानले जातात. शहरातील मंठा चौफुलीवर काही अज्ञातांनी गजानन तौर यांच्यावर गोळीबार केलाय. या गोळाबारात तौर यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. गजानन तौर हे रामनगर कारखान्याकडून जालनाकडे त्यांच्या चारचाकी वाहनाने येत होते.पाठीमागून मोटारसायकलवरून आलेल्या तीन जणांनी तौर यांच्या दिशेनं गावठी पिस्तूलातून चार गोळ्या झाडल्या.
भाजप नेते प्रसाद लाड संजय राऊतांवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार
भाजप नेते प्रसाद लाड संजय राऊतांवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहेत. कंपनीची बदनामी केल्याप्रकरणी लाड २०० ते ५०० कोटींचा दावा करणार आहेत. यासंदर्भात संजय राऊतांवर बोलताना लाड यांची जीभ घसरलीय... प्रसाद लाड यांच्या क्रिस्टल कंपनीत हजारो कोटींचा घोटाळा असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता.