नाशिकमध्ये दारणा नदीपात्रात चार मुलं बुडाले
दारणा नदीपात्रात चार जण बुडाले आहेत. चारही मुलं पोहण्यासाठी नदीत गेली होती. यातील दोघांचे मृतदेह सापडले असून अद्याप दोघांचा शोध सुरु आहे. पळसे शिवारात ही घटना घडली आहे.
नाशिक : दारणा नदीपात्रात चार जण बुडाले आहेत. चारही मुलं पोहण्यासाठी नदीत गेली होती. यातील दोघांचे मृतदेह सापडले असून अद्याप दोघांचा शोध सुरु आहे. पळसे शिवारात ही घटना घडली आहे.
काल दुपारी ही मुलं पोहण्यासाठी गेली होती रात्री उशिरापर्यंत ही मुलं घरी न आल्यानं त्यांचा शोध सुरू झाला. सकाळी सुमित भालेराव आणि कल्पेश माळी या दोघांचे मृतदेह सापडलेत, तर गणेश डहाळ, रोहित निकम यांचा शोध सुरू आहे.