श्रीकांत राऊत, झी मीडिया, अमरावती : अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या भिवापूर येथे वनविभागाने एका घरात धाड टाकली आहे. त्यावेळी घरातून चार मृत सायळ जप्त केल्या आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर तीन आरोपी अद्यापही फरार आहेत. वन्यप्राणी शिकारी संबंधीत प्राप्त झालेल्या माहितीवरून वनपाल, माळेगाव वर्तुळ यांनी पथक तयार केले आणि इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने भिवापूर येथील आरोपी विशाल किसन राठोडच्या घराची झडती घेतली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घराची झडती घेतल्यानंतर त्यांना चार सायळ घरामध्ये मृतावस्थेत आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. तर या गुन्ह्यामध्ये बरोबरीचा वाटा असलेले गोकुल रामदास चव्हान, दिनेश भाऊराव चव्हाण, मंगल देविदास जाधव हे तिन्ही आरोपी मात्र फरार आहेत. 


घरात वन्यजीव बाळगल्या प्रकरणी आरोपी विशाल किसन राठोडवर वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम ५० अन्वये अटक करण्यात आली आहे. तर गुन्हा्यातील सदर आरोपींविरूद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ च्या कलमनुसार आणि भारतीय दंड विधान १८६० चे कलम ३४ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला.    
आरोपी विशाल राठोड याला प्रथम श्रेणी न्यायालय, तिवसा येथे ते हजर केले असता त्याला १४ जुलै पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास माळेगावचे वनपाल करीत आहेत.