सोलापूर : सोलापूरमध्ये नात्याला काळिमा फासणारी एक घटना घडलीय. संपत्तीच्या वादातून मोठ्या भावानंच आपल्या लहान भावाचं घर पेटवून दिलंय... आणि या घटनेत आई आणि भावासह चार जणांचा आगीत होरपळून मृत्यू झालाय. बार्शी तालुक्यातील खांडवी गावात ही घटना घडलीय. 


राहुल देवकाते आणि कुटुंब

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देवकते कुटुंबात संपत्तीवरून वाद होता. याच वादातून मोठ्या भावानं आपला लहान भाऊ राहुल देवकते आणि त्याच्या कुटुंबाला संपवण्याचा कट रचला. 


राहुल देवकाते आणि कुटुंब रात्री झोपेत असताना मोठ्या भावानं लहान भावाच्या घरावर आणि त्याच्या कुटुंबीयांवर पेट्रोल टाकून त्यांना पेटवून दिलं. 


या घटनेत छोटा भाऊ राहुल देवकते, पत्नी सुषमा देवकते, मुलगा आर्यन देवकते आणि आई कस्तुरबा देवकते यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.