विरार : सेल्फी (Selfie) घेण्याचा नाद पुन्हा एकदा जीवावर बेतला आहे. सेल्फी घेण्याच्या नादात एकाच कुटुंबातील चार जणी बुडाल्या आहेत. विरार जवळच्या वैतरणा खाडी बंदरावर ही घटना घटना घडली आहे. दोन महिलांना वाचविण्यात यश आलं असून दोघींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.


विकएंडचं फोटोशूट बेतलं जीवावर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुट्टीच्या दिवशी अनेक जण फिरण्यासाठी बाहेर पडत असतात. पण यावेळी फोटो किंवा सेल्फी काढण्याचा मोह लोकांना आवरत नाही. काहीवेळी सेल्फीचा नाद जीवावर बेततो.