मुंबई : कोरोनाची दुसरी लाट आली, तेव्हा अशी शक्यता वर्तवली जात होती की, आत्तापर्यंत सर्वाधिक लोकांना हा संसर्ग झाला असावा. त्यामुऴे मग यामध्ये असे ही लोकं असतील ज्यांच्यामध्ये रोग प्रतिकारशक्ती कमी असू शकते. त्यामुळे अशा लोकांवरही सर्वे करणे आवश्यक आहे. सध्या देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव जवळ जवळ संपत आला आहे. परंतु आता तिसरी लाट भारतात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आयसीएमआरच्या मदतीने केंद्रीय आरोग्य मंत्रालय दुसऱ्या लाटेत किती लोकं प्रभावित झाले आहेत, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे.


मुलांवर मोठ्या संख्येने सर्वेक्षण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या वेळी सेरो सर्व्हेमध्ये मुलांना मोठ्या संख्येने समाविष्ट करण्यात आले आहे. देशातील या सर्वेक्षणात 14 हजार  प्रौढांसह (Adult), 14 हजार मुलांचा ही समावेश केला आहे. आतापर्यंतच्या सेरो सर्वेक्षणात दहा वर्षांच्या मुलांचा समावेश केला जात होता. परंतू या वेळी या सर्वेक्षणात 6 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांचा समावेश केला जाईल.


या वर्षाच्या सर्वेक्षणात गावांकडील लोकांचा मोठ्या प्रमाणात समावेश केला जाईल. कोविडच्या दुसर्‍या लाटेत असे दिसून आले की, गावांमध्ये मोठ्या संख्येने लोकं संक्रमित झाले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये गावातील मृत्यूची आकडेवारीही जास्त प्रमाणात दिसून आली आहे. अशा परिस्थितीत गावांची स्थिती लक्षात घेऊन सेरो सर्वेक्षण केले जाईल.


सेरो सर्वेक्षण का केले जाते?


सेरो सर्वेक्षणात, रक्ताचा नमुना घेतल्यास शरीरात किती अॅन्टीबॉडीज उपलब्ध आहे हे समजण्यास मदत होईल. या व्यतिरिक्त किती लोकांमध्ये अँटीबॉडी विकसित झाल्या आहेत याची देखील माहिती कळते.


देशात आतापर्यंत कोरोनोवर तिसरं सेरो सर्वेक्षण झाले आहे. आता चौथ्या सेरो सर्वेक्षणाला सुरवात होणार आहे आणि यामध्ये 6 वर्षांपेक्षा लहान मुलांचा देखील समावेश केला जाणार आहे.