मुलुंड : सोनं डबल करण्याच्या बहाण्यानं उस्मानाबादच्या कथित तांत्रिकानं मुलुंडमध्ये अनेकांना लाखोंचा गंडा घातल्याचं उघडकीस आलं आहे. अशोक चव्हाण असं या जादूटोणा करणाऱ्या तांत्रिकाचं नाव आहे. सोन्याचे दागिने डब्यात ठेवून तीन महिन्यांनी ते दुप्पट होईल, अशी बतावणी तो करायचा आणि मध्येच येऊन दागिने लंपास करायचा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलुंडच्या नवघर पोलिसांनी सापळा रचून अशोक चव्हाणला अटक केली आहे. कर्जाच्या ओझ्यातून सुटका व्हावी, यासाठी क्राईम सिरीयल्स पाहून लोकांना गंडवायला सुरुवात केल्याची कबुली या भोंदू तांत्रिकानं दिली आहे.


आतापर्यंत फसवणुकीच्या अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. तरी देखील लोकं या पासून धडा घेतांना दिसत नाहीत. त्यामुळे अशा लोकांपासून सावध राहण्याची गरज आहे.