ठाणे : ठाणे शहरामधील होरायझन प्राईम, सफायर, कौशल्या आणि वेदांत हॅास्पीटलमध्ये कोविड 19 बाधित गरीब गरजू नागरिकांना केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व राज्य सरकारच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचार सुविधा सुरू करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शहरातील कोरोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी विविध उपाययोजना सुरू आहेत. महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना कोविड - १९ घोषित केलेल्या रुग्णालयांमध्ये गरीब व मध्यमवर्गीय रुग्णांना कमीत कमी दरात योग्य उपचार मिळावेत यासाठी महापालिका प्रशासन आग्रही होते. या पार्श्वभूमीवर पिवळे, केशरी रेशनकार्डधारक व मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांना होरायझन प्राईम, सफायर, कौशल्या आणि वेदांत हॅास्पीटलमध्ये ही योजना सुरू करण्यात आली आहे.


या रुग्णालयात गरजू व वंचितांना मोफत कोविड -१९ उपचार मोफत दिले जाणार आहेत. शहरातील कोव्हीड बाधित गरीब नागरिकांना सरकारच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व राज्य सरकारच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत दाखल केले जाणार आहे. या योजनेंतर्गत उच्च प्रतीचे उपचार, अत्याधुनिक सुविधा व पौष्टिक जेवण सर्व रूग्णांना विनामूल्य उपलब्ध देण्यात येणार आहे.