शिर्डी : शिर्डीत येणार-या साईभक्तांसाठी आता मोफत वाय-फाय सुविधा दिली जाणर आहे. साईबाबा संस्थानच्या वतीने साई मंदीर परीसर, प्रसादालय आणि भक्त निवासात ही सुविधा भक्तांना दिली जाणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका नंबरवर दिवसातून फक्त 250 एमबी वाय-फाय वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. शिर्डीतील 15 ठिकाणी ही वाय-फाय सुविधा सध्या उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यानंतर त्याची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे.


तर दुसरीकडे मात्र साईबाबा मंदीर परिसरात सुरक्षेच्या कारणाने मोबाईल नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. वाय-फाय सुविधेमुळे साईमंदीराच्या सुरक्षेला धोका होवु शकतो का तसेच मंदीर परीसरात अनावश्यक गर्दी होईल अशी शंका ग्रामस्थांनी व्यक्त करत वाय-फाय सेवेतून साई मंदीर परीसर वगळण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.