एका सिगारेटसाठी मित्रानेच मित्राचा जीव घेतला; डोंबिवली मधील धक्कादायक घटना
सिगारेट आणून दिली नाही याचा मनात राग धरून मित्राने मित्राची हत्या केली आहे. या हत्येचा थरार सी सी टी व्ही मध्ये कैद झाला आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
आतिष भोईर, झी मीडिया, ठाणे : एका सिगारेटसाठी(cigarettes) मित्रानेच मित्राचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत(Dombivali) घडली आहे. सिगारेट आणून दिली नाही याचा मनात राग धरून मित्राने मित्राची हत्या केली आहे. या हत्येचा थरार सी सी टी व्ही मध्ये कैद झाला आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे डोंबिवलीत एकच खळबळ उडाली आहे.
सिगारेट आणून दिली नाही याचा मनात राग धरून एका मित्राने दुसऱ्या मित्राची भिंतीवर डोके आटपून हत्या केली. जयेश जाधव मृत व्यक्तीचे नाव आहे. जयेशच्या हत्येप्रकरणी त्याचा मित्र हरीश्चंद्र उर्फ बकूळ चौधरी याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
आरोपी बकूळला न्यायालयाने 15 तारखेर्पयत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या मारहाणीचा सीसीटिव्ही फुटेज समोर आलं आहे. डोंबिवलीतील पेंडसेनगर राहणारा जयेश जाधव आणि डोंबिवली पूर्व भागातील ठाकूर्ली परिसरात राहणार बकूळ चौधरी हे दोघे मित्र आहेत. 4 नोव्हेंबरच्या दुपारी दोघे दारु पिण्यासाठी बसले होते.
त्या ठिकाणीहून घरी येण्यासाठी निघाले असता डोंबिवली पूर्व भागातील पेंडसे नगरातील एका इमारतीच्या गेटवर आले असता बकूळ याने जयेशला सिगारेट घेऊन ये असे सांगितले. त्यासाठी त्याने पैसे दिले होते. जयेशने सिगारेट आणली नाही. त्यामुळे बकुळ संतापला त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादात बकूळ याने जयेशला ठोषा बुक्क्यांनी मारहाण केली. त्याचे डोके भिंतीवर आपटले.
या मारहाणीत जयेशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला मुंबईतील सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, प्रकृती खालावल्यामुळे उपचारा दरम्यान जयेशचा मृत्यू झाला. अखेर डोंबिवली रामनगर पोलिसांनी बकूळच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली आहे. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 15 नाव्हेंबर्पयत पोलिस कोठडी सुनावली आहे .