धुळे : धुळे जिल्ह्यातील खलाणे गावातील शहीद जवान योगेश भदाणे यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 


सकाळी होणार अंत्यसंस्कार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज सकाळी साडेअकरा वाजता शहीद योगेश यांचं पार्थिव नाशिकच्या ओझर विमानतळावर आणलं जाईल. यानंतर हेलीकॉप्टरनं खलाणे गावात आणलं जाणार आहे. यासाठी खलाणे गावात हॅलिपॅड तयार करण्याचं काम युध्द पातळीवर सूरू आहे. 


मानवंदना देण्यासाठी मोठी गर्दी


शहीद योगेश यांना अखेरची मानवंदना देण्यासाठी हजारोंचा जनसमूदाय आणि लोकप्रतिनिधी येणार असल्यानं पोलीस दल त्या दृष्टीनं तयारी करतायत. नाशिकमध्ये त्याना मानवंदना देण्यात येईल.