सांगली : बोरगाव इथे बापू बिरू वाटेगावकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बहे बोरगाव ह्या त्यांच्या गावी अतिमसंस्कार करण्यात आले. मुलगा शिवाजी वाटेगावकर यांनी बापू बिरूंच्या पार्थिवाला अग्नी दिला. यावेळी कृष्णा काठच्या रॉबिनहूडचं अंतिम दर्शन घेण्यासाठी हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. त्या अगोदर बोरगाव इथल्या त्यांच्या घरापासून, कृष्णा घाट पर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली.