Gadchiroli Crime News : दोन महिलांच्या भांडणात SRPF जवानाचा मृत्यू झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे एक खबळउडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका SRPF जवानालाच आरोपी म्हणून ताब्यात घेतले आहे. अंतगर्त वादातून हा सर्व प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथील विसोरा SRPF कॅम्प येथे ही घटना घडलेय. जवानांसोबत राहत असलेल्या कुटुंबियातील दोन महिलांचे भांडण झाल्यावर दोन SRPF जवान हमरीतुमरीवर आले. त्यातील एकाने चक्क चाकूने हल्ला करून दुसऱ्याला  ठार केले. मृत जवानाचे नाव सुरेश राठोड  (वय 30 वर्षे) तर, आरोपी जवानाचे नाव मारोती सातपुते असल्याची माहिती समोर येत आहे.  दोघेही SRPF च्या गडचिरोली गट क्र. 13 चे जवान आहेत. 


गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल झाली आहे. राज्य राखीव पोलीस दलाच्या कॅम्पमध्ये चाकुने हल्ला करून एका जवानाची हत्या करण्यात आली आहे. याच परिसरात असलेल्या वसाहतीत जवानांसोबत राहत असलेल्या कुटुंबियातील दोन महिलांचे टोकाचे भांडण झाले. यानंतर त्यांचे पती असलेले दोन SRPF जवान हमरीतुमरीवर आले. जोरदार हाणामारी झाल्यावर त्यातील एकाने चक्क चाकूने हल्ला करून दुसऱ्याला ठार केले.  या घटनेने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.


वृद्धेवर चोरट्याचा जीवघेणा हल्ला करुन दागिने लुटले


यवतमाळच्या उमरखेड येथे दुग्धव्यवसाय करणाऱ्या वृद्ध महिलेवर ती झोपेत असताना अज्ञात चोरट्याने हल्ला चढवीत तिच्या अंगावरील दागिने लुटून नेले. दागिने लुटणाऱ्यां चोरट्याचा प्रतिकार केल्याने त्याने लोखंडी रॉड ने वृद्धेवर हल्ला केला. यात ती गंभीर जखमी झाली. ही संपूर्ण थरारक घटना सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाली आहे. लक्ष्मी सुरोशे असे जखमी वृद्धेचे नाव असून ती शेड मध्ये बांधून असलेल्या गाय व म्हशीच्या सुरक्षेसाठी शेजारच्या फूड कॉर्नर बाहेर झोपलेली होती, दरम्यान चोरट्याने दागिने लुटण्यासाठी अमानुष हल्ला केला आहे.