एसटीला फुटले पंख, गडचिरोलीच्या रस्त्यावर धावणाऱ्या `लालपरी`चा Video व्हायरल... एकदा पाहाच
Gadchiroli Bus Viral Video: गडचिरोलीत पंख फुटलेल्या एसटी बसचा व्हिडिओ झाला व्हायरल, लाल परीचे छत उखडल्यानंतरही भरधाव वेगात जात होती एसटी बस
Gadchiroli ST Bus Viral Video: गडचिरोलीत (Gadchiroli) पंख फुटलेली एसटी धावतेय. काय तुमचाही विश्वास बसत नाहीये ना. मग तर तुम्ही हा व्हिडिओ बघायचाल हवा. गडचिरोलीतील एका लालपरीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. बसचे छत उखडल्यानंतरही भरधाव वेगात जात होती. अशा धोकादायिक स्थितीत धावणाऱ्या या एसटी बसचा व्हिडिओ पुढे असलेल्या वाहनातील एका इसमाने त्याच्या कॅमेऱ्यात चित्रीत केला आहे. राज्यभरातील एसटी बसच्या वाईट स्थितीचे दर्शन घडवणारा हा व्हिडिओ सध्या मोठ्या फ्रमाणात व्हायरल होतो आहे. (ST Bus Viral Video)
मागील साठ वर्षांपासून लालपरी अर्थात एसटी बस ही ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते. गाव खेड्यात अजूनही एसटीनेच प्रवास केला जातो. महाराष्ट्रातील खेडो-पाड्यातील लोक एसटीनेच प्रवास करतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून एसटीची दुरावस्था समोर येत आहे. अनेक आगारातील एसटी बसेसच्या फुटलेल्या काचा, फाटलेल्या सीट आणि पत्रा गंजलेला अशा अवस्थेत दिसत आहेत. असाच एक व्हिडिओ गडचिरोलीतील एसटी बसचा व्हायरल झाला आहे. एसटी बसच्या वरचा पत्रा उखडलेला आहे.
एसटी बसचा व्हायरल व्हिडिओ गडचिरोलीतील आहे. बसचे छत तुटलेले आहे तरीही न थांबवता बसचा चालक ती दमटवत पुढे नेत आहे. लाल परीचे छत पूर्णपणे तुटलेले आहे. मात्र असे असतानाही भरधाव वेगात ही बस पुढे धावत आहे. या एसटीच्या पुढे असलेल्या वाहनातील इसमाने हा व्हिडिओ काढल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यभरात छत गळणारी, प्रत्येक सुटा भाग वाजत असणारी, ब्रेक फेल झालेली अशा अनेक एसटी बसेसचे दर्शन प्रवाशांना वेळोवेळी होत असते. मात्र दुर्गम भागातील एसटी बसेसच्या वाईट स्थितीचे दर्शन घडवणारा हा नमुनेदार व्हिडिओ मात्र भलताच व्हायरल होत आहे. या बसमधील प्रवाशांचे काय झाले असेल याची कल्पनाच केलेली बरी. या एसटी बसचा मागोवा घेत कर्मचाऱ्यांना प्रवाशांचा जीव महत्वाचा आहे, हे सांगण्याची गरज व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजे एसटी गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक संकटात आहे. एसटीच्या ताफ्यातील अनेक बसेसची दुरावस्था झाली आहे. काही बस या मोडकळीस आलेल्या आहेत. तरीही ग्रामीण भागात सर्रास या बस सोडल्या जातात. अनेकदा या बस वाटेतच बंद पडतात. जीव मुठीत घेऊनच प्रवाशांना प्रवास करावा लागतो. तिचं दुरावस्था या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आली आहे.