Konkan Ganeshotsav 2023 : गणरायाची प्राणप्रतिष्ठापना होण्यासाठी आता अवघ्या काही तासांचाच कालावधी शिल्लक असताना शेवटच्या क्षणी गावाच्या दिशेनं जाणाऱ्यांचाही आकडा मोठा आहे. अखेरच्या टप्प्यावर सुट्ट्या मिळालेल्यांनीही मिळेल त्या सर्व शक्य वाहनांनी गावाकडची वाट धरली आहे. अशा या उत्साहपूर्ण वातावरणात गावाकडे निघालेल्या सर्वांनाच वाहतूक कोंडीमुळं मनस्तापाचाही सामना करावा लागत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुक्रवारपासूनच कोकणच्या दिशेनं जाणाऱ्यांचा आकडा वाढत गेला आणि रविवारपर्यंत अनेकांनीच कोकणची वाट धरल्याचं पाहायला मिळालं. कोकणच्या दिशेनं रस्ते मार्गानं जाणाऱ्यांच्या वाटेत बऱ्याच अडचणी आल्याचं पाहायला मिळालं. मग टोलनाक्यांवर असणाऱ्या रांगा असो किंवा एखाद्या मोक्याच्या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी असो. रविवारी रायगड - मुंबई गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. जिथं अनेक चाकरमानी अडकले. 


इंदापूर नजीक वाहनांच्या लांबच लांब रांगाही पाहायला मिळाल्या. कोकणातून ये-जा करणाऱ्या लेनवर वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याचं पाहायला मिळालं. तर, काही काळासाठी ही वाहतूक कोलाड येथून महाड कडे वळवण्याचा प्रयत्न करण्यात आला.


कोकणात जाण्यासाठीचे पर्यायी मार्ग वापरा, पण आधी वाहतूक कोंडीचा अंदाज घ्या... 


कोकणात जाणाऱ्या वाहनांची संख्या पाहता तुम्हीही या वाटांवर जाणार असाल तर काही पर्यायी मार्गांचा वापर करू शकता. मुंबईच्या दिशेनं निघणाऱी सर्व मंडळी नवी मुंबईपासूनचा टप्पा ओलांडण्यासाठी खासगी वाहनानं प्रवास करत असल्यास पामबीच मार्गाचा वापर करू शकतात. त्यापुढं पनवेलहून पुढं निघण्यासाठी कर्नाळ्याचा घाट टाळायचा झाल्यास चिरनेसमार्गे खारपाडा गाठता येऊ शकतो. इथं तुमचा काहीसा वेळ वाचेल. 


खुद्द तळकोकणात जाणाऱ्यांनी जुन्या महामार्गाचा वापर करण्याऐवजी मुंबई- पुणे महामार्गावरून प्रवास सुरु केल्यास त्यांची वेळ वाचेल. इथं मुंबई सोडताना मात्र त्यांना वाहतूक कोंडीचा सामाना करावा लागू शकतो. पुढं ही मंडळी सातारा, कराड, निपाणी, कोल्हापूर, आंबोली घाट मार्गे कोकणात पोहोचू शकतात.  तिथं वडखळपाशी वाहतूक कोंडी झाल्यास वडखळ, पोयनाड, पेजारी चेकपोस्ट, नागोठणे मार्गे वाकण गाठता येऊ शकतं. तर, पेणपाशी वाहतूक कोंडी असल्या, तरणखोप, पेण बायपास, पालीमार्गे वाकण दिशेनं प्रवास करता येऊ शकतो. 


हेसुद्धा वाचा : Maharashtra Rain : कोकणापासून विदर्भापर्यंत येत्या आठवड्यात राज्यात मध्यम स्वरुपातील पावसाची शक्यता 


 


पर्यायी मार्गांवरून प्रवासाची वेळ मागेपुढे होऊ शकते. पण, वाहतुक कोंडीतून मात्र काहीशी सुटका होऊ शकते. सद्यस्थितीला कोकणात जाणाऱ्या मंडळींनी हाताशी बारा ते पंधरा तास (तळकोकण) आणि अलिबाग दिशेला जाण्यासाठी साधारण चार तासांचा वेळ हाताशी ठेवून निघावं. प्रवाशांच्या सेवेसाठी प्रशासनानं ठिकठिकाणी मदकेंद्र सुरु केली आहेत. त्यासोबतच तुम्ही Googl Maps ची मदक घेऊनही वाहतुकीचा अंदाज घेऊ शकता. त्यामुळं सोयीनं प्रवास करा. गपणती बाप्पा मोरया!!!