प्रेरणा कोरगांवकर, मुंबई : मध्य रेल्वेने कोकणात गणपतीला जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी 72 गणपती स्पेशल ट्रेन सोडल्या आहेत, संपूर्ण आरक्षित असलेल्या या गाड्यांचे बुकिंग गुरुवार 8 जुलै रोजी सुरु होणार आहे. सकाळी 8 वाजल्यापासून बुकींग सुरू करण्यात येणार आहे. या ट्रेन सीएसएमटी-पनवेल आणि सावंतवाडी रोड, रत्नागिरीदरम्यान चालविण्यात येणार आहेत. या ट्रेन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 'सोशल डिस्टन्सिंग'चे सर्व नियम पाळून चालविण्यात येणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे ट्रेनचं वेळापत्रक ?


सीएसएमटी ते सावंतवाडी रोड – दैनिक स्पेशल (36 फेऱ्या)


ट्रेन क्र. 01227 -  ही ट्रेन दररोज 5 ते 22 सप्टेंबरदरम्यान सीएसएमटीहून रात्री 12.20 वा. सुटून सावंतवाडी रोडला दुपारी 2.00 वा. पोहोचेल.


ट्रेन क्र. 01228 - ही परतीच्या प्रवासाची ट्रेन 5 ते 22 सप्टेंबरदरम्यान दररोज सावंतवाडीहून दु. 2.40 वा. सुटेल आणि सीएसएमटीला पहाटे 4.35 वा. पोहोचेल.


स्टॉप कोणते असतील ?


दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड
चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, 
रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड,
 कणकवली, नांदगाव रोड, सिंधुदुर्ग आणि कुडाळ


सीएसएमटी ते रत्नागिरी – द्विसाप्ताहिक  (10 फेऱ्या) 


ट्रेन क्र. 01229 - ही ट्रेन 6 ते 20 सप्टेंबरदरम्यान आठवडय़ातून 2 वेळा म्हणजेच सोमवार आणि शुक्रवार सीएसएमटीहून दु 1.10 वा. सुटून रत्नागिरीला रात्री 10.35 वा. पोहोचेल.


ट्रेन क्र. 01230 - ही परतीची ट्रेन 6 ते 20 सप्टेंबरदरम्यान आठवडय़ातून 2 वेळा म्हणजेच रविवार आणि गुरुवार रत्नागिरीहून रात्री 11.30 वा. सुटून सीएसएमटीला सकाळी 8.20 वा. पोहोचेल.


स्टॉप कोणते असतील ?


 दादर, ठाणे, (केवळ ट्रेन क्र. 01229) पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड,
चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड


 


पनवेल ते सावंतवाडी रोड – त्रैसाप्ताहिक (16 फेऱ्या)


ट्रेन क्र. 01231 - ही ट्रेन 7 ते 22 सप्टेंबरदरम्यान आठवड्यातून 3 वेळा म्हणजेच मंगळवार, बुधवार आणि शनिवार पनवेलहून सकाळी 8.00 वा. सुटून सावंतवाडीला रात्री 8.00 वा.पोहचेल.


ट्रेन क्र. 01232 - ही परतीची ट्रेन 7 ते 22 सप्टेंबरदरम्यान आठवड्यातून 3 वेळा म्हणजेच  मंगळवार, बुधवार आणि शनिवार सावंतवाडीहून रात्री 8.45 वा. सुटून पनवेलला सकाळी 7.10 मिनिटांनी पोहचेल.


स्टॉप कोणते असतील ?-


रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, 
अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, नांदगाव रोड, सिंधुदुर्ग आणि कुडाळ


पनवेल ते रत्नागिरी – द्विसाप्ताहिक स्पेशल (10 फेऱ्या)


ट्रेन क्र.01233-  ही ट्रेन  9 ते 23 सप्टेंबरदरम्यान आठवड्यातून 2 वेळा म्हणजेच  गुरुवार आणि रविवार पनवेलहून सकाळी 8.00 वा. सुटून रत्नागिरीला दुपारी 3.40 वा. पोहोचेल.


ट्रेन क्र. 01234 - ही परतीची ट्रेन  6 ते 20 सप्टेंबरदरम्यान आठवड्यातून 2 वेळा म्हणजेच सोमवारी आणि शुक्रवारी रत्नागिरीहून रात्री 11.30 वा. सुटून पनवेलला सकाळी 6.00 वा. पोहचेल.


स्टॉप कोणते असतील ?-


 रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड


या सर्व गाडय़ांच्या डब्यांची स्थिती - एक एसी 2 टिअर कम एसी 3 टिअर, चार एसी 3 टिअर, 11 स्लीपर क्लास, 6 सेकंड क्लास सीटिंग असेल