अरूण मेहेत्रे, झी मीडिया पुणे : राज्यात शुक्रवारी 11 दिवसांच्या बाप्पांना निरोप देण्यात आला. गणेशभक्तांनी जड अंत:करणाने लाडक्या बाप्पाला निरोप दिला. तसेच बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर या अशी साद देखील घातली होती. दरम्यान या बाप्पाच्या विसर्जन मिरवणूकी दरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. असाच एक व्हिडिओ आता समोर आला आहे. या व्हिडिओत पोलिस तुफान डान्स (police dance) करताना दिसत आहे. या व्हिडिओची (video) सोशल मीडियावर प्रचंड चर्चा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईसह पुण्यात उत्साहात बाप्पाचे विसर्जन (ganesh visarjan) करण्यात आले आहे. बाप्पाच्या विसर्जनाच्या मिरवणूकीत गणेशभक्तांनी तुफान डान्स केल्याचे चित्र तुम्ही शुक्रवारी दिवसभर पाहिले असेलच. मात्र यात कर्तव्य बजावत असलेले पोलीसही मागे राहीले नाही. ते देखील विसर्जनाच्या मिरवणूकीत ठेका धरताना पाहायला मिळाले. या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर आला आहे.  


गणेशोत्सवात (Ganeshotsav) पोलीस 24  तास कर्तव्यावर असतात. या काळात त्यांना स्वत:च्या घरच्या गणपतीची सेवा करण्यासाठी देखील वेळ मिळत नाही. बाहेरच्या बाहेर ड्युटीवर असताना सर्वसामन्यांची देखभाल करत असताना ते बाप्पांच दर्शन घेत असतात. सणासुदीला कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ते 11 च्या 11 दिवस रात्र डोळ्यात तेल घालून पाळत ठेवत असतात. दिवसभर ऊन, वारा, पाऊस सोसत ते सर्वसामान्यांसाठी दिवसरात्र झटत असतात. या सर्व दिवसांत पोलिसांवर अतिप्रचंड ताण असतो, शरीराने आणि मानसिकरित्या ते थकलेले असतात. मात्र इतकं असलं तरी ते ती थकावट न जाणवता कर्तव्य बजावत असतात. 


मात्र आता एक असाचं व्हिडिओ समोर आला आहे, जो त्या 11 दिवसांची थकान दुर करेल. विशेष म्हणजे हा व्हिडिओ कुठल्या गणेशभक्ताचा नव्हे तर कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांचाच आहे. 24 तास कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी मिरवणूकीत ठेका धरल्याचा पाहायला मिळालं.



पुण्यात गणपती मिरवणूकीत पोलिसांनी कार्यकर्त्यांसोबत चांगलाच ठेका धरला होता. लक्ष्मी रस्त्यावरील मिरवणुकीतील शेवटचं मंडळ असलेल्या महाराष्ट्र तरुण मंडळाचा गणपती बेलबाग चौकातून पुढे गेला. ही मिरवणूक चौकात आली. त्यावेळी 24 तास बंदोबस्तावर तैनात असलेले पोलिस बेभान होऊन मिरवणूकीत नाचले होते. पोलिसांचा हा नाचताचा व्हिडिओ आता तुफान व्हायरल होत आहे.