Ganeshotsav 2023 Konkan Railway Special Trains : जुलै महिना ओलांडल्यानंतर गणेशोत्सवाची चाहूल लागते आणि जसजसा दिवस पुढे जातो तसतशी ही उत्सुकता वाढतच जाते. अनेकांनाच गावाचे आणि त्यातूनही कोकणाकडे जाण्याचे वेध लागतात. अशा या गणेशोत्सवाची धूम यंदाही पाहायला मिळत आहे. अनेकांची लगबग सुरु झाली आहे. कारण आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी प्रत्येकजण सज्ज झाला आहे. नोकरदार वर्गानं कार्यालयांमध्ये आर आधीच सुट्ट्यांसाठी अर्जही केले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही मंडळींना मात्र (Holidays) सुट्ट्यांसाठी झिगझिग चुकलेली नाही. तर, काहींना अगदी शेवटच्या क्षणापर्यंत कामांचा डोंगर असल्यामुळं गावाला नेमकं जायचं कधी हाच प्रश्न पडला आहे. कारण, एसटी आणि रेल्वेगाड्या तर फुल्ल झाल्या आहेत. अशा सर्वांच्याच हाकेला रेल्वे नव्हे, तर या रेल्वेच्या रुपात बाप्पाच धावून आला आहे असं म्हणावं लागेल. कारण, आता कोकणात जाणाऱ्या नागरिकांसाठी पुण्यातून तीन विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय रेल्वे विभागाकडून घेण्यात आला आहे. 


गणपती विशेष रेल्वे 


दरवर्षी मोठ्या संख्येनं शहरातील नागरिक गणेशोत्सवासाठी त्यांच्या गावाची वाट धरतात. यामध्ये कोकणाच्या दिशेनं जाणाऱ्यांचा आकडा मोठा असतो. अशा सर्वांसाठीच रेल्वेनं एक खास भेट दिली आहे. गणेशभक्तांना आपल्या गावाला जाता यावं यासाठी बऱ्याच 'गणपती विशेष रेल्वे गाड्या' चालवण्यात येतात. यावर्षीही अशा गाड्यांची सोय रेल्वे विभागानं केलेली आहे. 


15, 22 आणि 29 सप्टेंबर रोजी या विशेष गाड्या त्यांच्या वेळापत्रकाप्रमाणं कोकणटची वाट धरतील. पुणे, लोणावळा, पनवेल, रोहा, मानगाव, खेळ, चिपळूण, सावरडा, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर, वैभववाडी, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ अशा स्थानकावर ही रेल्वे थांबेल. दरम्यान्या कोणत्याही स्थानकावर उतरायचं झाल्यास या गाड्या तुमच्यासाठी सोईस्कर ठरणार आहेत. 


हेसुद्धा वाचा : Maharashtra Rain : पावसानं अंत पाहिला; कोकण, विदर्भासह राज्यात फक्त श्रावणसरी


वरील तारखांवर या गाड्या पुणे स्थानकातून सायंकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी पुणे रोखानं प्रवास सुरु करतील. तर, कुडाळरून पुण्यापर्यंतच्या परतीच्या प्रवासासाठीच्या गाड्या 17 सप्टेंबर, 24 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबरला दुपारी 4 वाजून 5 मिनिटांनी पुण्याच्या दिशेनं निघतील. त्यामुलं, दीड दिवसाचे गणपती, गौरी गणपती, सात आणि बारा दिवसांच्या गणपतींसाठी तुम्ही कधी जाताय हे नक्की ठरवा आणि तयारीला लागा.