Ganeshotsav : पुणेकरांसाठी गणेशोत्सवाची नियमावली जाहीर
गणेशोत्सावर यंदाही कोरोनाचं सावट कायम आहे.
पुणे : गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. पण यंदाही गणेशोत्सावर कोरोनाचं सावट कायम आहे. कोरोना सोबतच आता राज्यात पुरामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुण्यात गणेशोत्साठी नियम जाहीर करण्यात आले आहेत. Ganeshotsav rules announced for Pune
१. श्री गणेशाची मूर्ती - सार्वजनिक मंडळासाठी ४ फुट तर घरगुती गणपतीसाठी २ फुटांची मर्यांदा
२. सांस्कृतीक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम आयोजित करण्याच्या सूचना
३. आरती, भजन, किर्तन अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी.
४. गणपती मंडपांमधे निर्जतुकीकरण तसेच थर्मल स्क्रिनिंगची पर्याप्त सुविधा उपल्बध करावी
५. श्रीं च्या आगमन आणि विसर्जन मिरवणूक काढण्यात येऊ नये.
६. लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे.
गेल्यावर्षी करोनाच्या संकटामुळे राज्य सरकारने गणेशोत्सवावर काही निर्बंध घातले होते. यंदाही राज्य सरकारकडून काही निर्बंध येण्याची शक्यता आहे.