विकास गावकर, झी मीडिया, सिंधदुर्ग : गणेशोत्सवाला आता अवघे काही तास शिल्लक राहिलेत. कोकणात चाकरमान्यांची गर्दी झालीय. रेल्वे स्थानक, एसटी बस स्थानक गजबजून गेलेत. बाजारपेठांमध्येही गर्दी झालीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोकणी माणूस देशात कुठेही का असेना गणपतींचे वेध लागले की मिळेल त्या वाहनाने तो हटकून घरी येतोच. म्हणूनच सध्या कोकणातली रेल्वे आणि बस स्थानकं पुन्हा जिवंत झालीत. या प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वे आणि एसटी प्रशासनानं जादा गाड्या सोडल्यात.. पण या गाड्याही कमी पडताहेत.. म्हणून अनेकांनी खासगी वाहनं करुन गावाकडचा रस्ता धरलाय.


मुंबईतनं बरिचशी खरेदी झाली असली तरी तोरणं, डेकोरेशनचं साहित्याच्या खरेदीसाठी बाजारपेठाही गजबजून गेल्यात. बाजारपेठांतली वाढती गर्दी लक्षात घेता बाजारात पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आलाय.


निसर्ग सौंदर्यानं नटलेला कोकण आता काही तासांतच आरतीचे स्वर आणि धूपबत्तीच्या सुगंधानं दरवळून जाईल... पुढील दहा दिवस कोकणातल्या प्रत्येक वाडीवर... प्रत्येक घरावर फक्त गणरायाचं आधिराज्य असेल...