नागपूर : येथील मध्यवर्ती कारागृहात (Nagpur Central Jail) टोळीयुद्ध  (Gang war) भडकले आहे. या गँगवॉरमुळे कारागृह प्रशासनात खळबळ उडाली होती. (Gang war in Nagpur Central Jail) यामध्ये दोन बंदीवान जखमी झाले आहेत. शेख रिजवान शेख मिजफ आणि मोनू सुमद्रे अशी जखमी कैद्यांची नावे आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कागरागृहात सौरभ तायवाडे, मनोज समुद्रे आणि मोहम्मदे आमीर जहीर पटेल यांना खूनाचा प्रयत्न करणे मोक्का अंतर्गत कारागृहात आहे. तर प्रज्ज्वल शेंडे हा मानकापूर,  संतोष गोंड एमआयडीसी पोलीस स्टेशनअंतर्गत झालेल्या हत्याकांडाच्या गुन्ह्यात बंदीस्त आहे.


प्रज्वल, संतोष आणि रिजवान यांची टोळी आहे. या तिघांनी आणीर पटेल याला मारहाण केली होती..त्यामुळं आमीरचे साथिदार सौरभ आणि मोनू संतापले होते. त्याचा वचपा काढण्याची संधी ते शोधत होते. मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास बराक क्रमांक पाचच्या मागे रिजवाने गाठले आणि त्याच्यावर हल्ला केला. लोखंडी पट्टीने त्याच्यावर डाव्या गालावर हल्ला जखमी केले. 


मारहाणीत मोनूच्या हातालाही लागल्यानं तोहीजखमी झाला. या घटनेमुळं कारागृहात खळबळ उडाली. त्यानंतर धंतोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


टोळीयुद्धचा या घटनेनं तुरुंगातील व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. तुरुंगाच्या भिंतीआड, पावलोपावली तुरुंग रक्षक तैनात असताना उसळेलेले हे गँगवॉर, हाणामारीच्या या घटनेनंतर आगामी काळात अजून मोठे स्वरुप घेवू शकते, याकडे आता कारागृह प्रशासनाला लक्ष द्यावे लागणार आहे.