Nagpur Crime News: नागपुरात सिनेस्टाइल थरार घडला आहे. कळमना परिसरात कुख्यात गुंडांची (Gangster Murder) दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आतिष उर्फ बाबा वरफटा ठाकरे असं या कुख्यात गुंडाचे नाव आहे. पोलिसांनी हत्येचा तपास सुरू केल्यानंतर आरोपीची नावं समोर येताच पोलिसही (Nagpur Police) चक्रावले आहेत. 


अज्ञात मृतदेह सापडला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दत्तवाडी येथील शनी मंदीर परिसरात एक मृतदेह सापडला होता. प्रथमदर्शनी इसमाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याचे दिसत होते. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी मृतकाच्या भावाला बोलवलं. त्याच्याकडून ओळख पटल्यानंतर पोलिसांनी अधिक चौकशी करण्यास सुरुवात केली.


कुख्यांत गुंडाच्या मित्रावरच संशय


पोलिस चौकशीकरत असताना मयत व्यक्ती रात्री त्याच्या गुन्हेगारी क्षेत्रातील मित्र सिफ इम्तियाज अली, सोहेल शेख उर्फ अन्नू राहुल बागडे यांच्यासोबत गेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि तिघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले. मात्र पोलिस चौकशी करत असताना तिघेही समाधानकारक उत्तरे देत नसल्याचे पोलिसांच्या लक्षात आले आणि त्यांचा संशय अधिक बळावला. 


मित्रांनी दिली कबुली


पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर या तिघांनीच कुख्यात गुंडाची हत्या केल्याचं सामोरं आले आहे. या तिघांचा यापूर्वीदेखील असाच वाद झाला होता. आताही गुन्हा घडला त्यादिवशीसुद्धा असाच तिघांचा मयत व्यक्तीसोबत वाद झाला. 


काय घडलं नेमकं?


घटनेच्या दिवशी चौघेही सोबत दारू पिण्यासाठी गेले होते. रात्री दारू पित चौघेही बसले असताना यात असिफ आणि आतिषचा वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की दोघांमध्ये हाणामारी झाली. यातच आतिषने असिफला धक्का दिला. मात्र तोल सांभाळता न आल्याने तो इतर दोघांचा अंगावर जाऊन पडला. त्यानंतर तिघांनी संतप्त होत आतिषला मारहाण केली. मात्र वाद इतका विकोपाला गेला होता की तिघांनी अखेर दगडाने ठेचून त्याची हत्या केली. 


पोलिसांनी केली अटक


कळमना पोलिसांनी केलेल्या चौकशीत हा गुन्हा उघड झाला आहे. तिन्ही आरोपींना गुन्हे शाखेने अटक करत कळमना पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. 


कल्याणमध्ये डॉक्टरला लूटले


कल्याणमध्ये रिक्षा चालक (Kalyan Auto Driver) आणि त्याच्या तीन मित्रांनी डॉक्टराची लूट केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. रिक्षा चालक व त्याच्या तीन मित्रांनी रिक्षात बसल्यावर डॉक्टराची लूट केली आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या डॉक्टरच्या खात्यातून ७३ हजार व त्याच्याजवळील पैसे आणि सोने लुबाडून नेले. डॉ. जवाहरलाल चिलगर असं या डॉक्टरांचे नाव आहे.