अलिबाग : गांजाची तस्‍करी करणाऱ्या आंतरराज्‍य टोळीचा छडा रायगड पोलिसांनी लावला आहे. ठिकठिकाणी टाकलेल्‍या छाप्‍यांमध्‍ये ही पोलिसांनी कारवाई केली आहे. तीन कारवायांमध्‍ये आतापर्यंत जवळपास ९२ किलो गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. त्‍यांची किंमत ११ लाख रूपये इतकी आहे. या प्रकरणात १० आरोपींना अटक करण्‍यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून तीन चारचाकी आणि एक दुचाकी वाहन जप्‍त करण्‍यात आले आहे. स्‍थानिक गुन्‍हे अन्‍वेषण शाखेने कर्जतमध्‍ये गांजा तस्‍करांना अटक केली. अटक करण्यात आलेल्यांकडून मिळालेल्‍या माहितीवरून पोलिसांनी वडाळा, खालापूर, नाशिकमध्‍ये गांजाचा मोठा साठा जस्त केला आहे.



या रॅकेटची पाळेमुळे आंध्रपदेश, विशाखापटट्णम ते मध्‍यप्रदेशपर्यंत पसरली असल्‍याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. यातून मोठे रॅकेट उघडकीस येण्‍याची शक्‍यता पोलिसांनी वर्तवली आहे.


0