मुंबई : सुफर फास्ट तेजस एक्स्प्रेसमध्ये गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्यांना उकडीचे मोदक मिळणार आहेत. हे मोदक 'आयआरसीटीसी' पुरवणार आहे. तसा त्यांनी निर्णय घेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 तेजस एक्स्प्रेस मेनूकार्डमध्ये गणेशोत्सव काळात उकडीचे मोदक उपलब्ध असतील, अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली. मोदक देऊन कोकणात जाणाऱ्यांचा प्रवास अजून गोड करण्याचा प्रयत्न  होत आहे. 


सुरुवातीला तेजस एक्स्प्रेसमध्ये पुरवण्यात येणाऱ्या खाण्याच्या मेनूवरून प्रवाशांनी रेल्वे प्रशासन आणि भारतीय रेल्वे कॅटरिंग सेवेवर टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर आयआरसीटीसीने कोकणातील पदार्थाचा समावेश मेनू कार्डमध्ये केला आहे. आता भविष्यात यात काजू उसळ, मासे, अळू वडी, बटाटे काप तसेच bibbe upkari, beans upkari, uma's culinary world हे पदार्थ उपलब्ध करुन देण्याचा मानस आहे.


 


तसेच त्यानंतर प्रवाशांकडून सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्याबाबतचा प्रस्ताव असून अंतिम निर्णय झालेला नाही. हा  प्रस्ताव  रेल्वे मंत्र्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या मंजूरीनंतर अन्य सुविधा मिळतील, असे सांगण्यात आले.