वर्धा, झी मीडिया, मिलींद आडे : घरात वाढ दिवसाची (Birthday Party )  तयारी सुरु असताना भयानक घटना(shocking News:) घडली आहे.  एका क्षणात रंगाचा बेरंग झाला आहे. वर्धा( Wardha) येथे ही घटना घडली आहे. या घटनेत चौघेजण जखमी झाले आहेत. मात्र, बर्थ डे बॉय सुखरुप बचावला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यात ही घटना घडली आहे. यात सिलिंडरच्या स्फोटात चार जण जखमी झाले आहेत. समुद्रपूर तालुक्यातील गिरड गावात ही घटना घडलेय.  मुलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी स्वयंपाक सुरू होता. त्यावेळी सिलिंडर लिक झाला. स्वयंपाक सुरू सिलेंडरचा स्फोट झाला. ही आग विझवण्यासाठी गेलेले चौघे भाजले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या स्फोटामुळे घराच्या क्राँक्रिटच्या छताला भेगा पडल्या आहेत.


परडा गावात एका मुलाचा पाचवा वाढदिवस होता. या निमित्ताने घरात पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी स्वयंपाकाची तयारी सुरु असताना सिलेंडरचा स्फोट झाला. हा स्फोट इथका भीषणा होता की घराच्या छताला भेगा पडल्या. स्फोटानंतर संपूर्ण घराला आग लागली. आगी ने रौद्र रूप धारण केले. आगीचे लोळ उठले.


आगीवर नियंत्रण मिळवताना शंकर ग्यानेश्वर चंदनखेडे, कुणाल शंकर चंदनखेडे, शंकर बालाजी पाल आणि आणखी एक व्यक्ती असे चार जण जखमी झाले. जखमींना सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या घटनेमुळे घराचे मोठे नुकसान झाले आहे. गॅस सिलेंडमधून गॅस लिक झाल्याने हा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली.