Raigad Crime News : कोकण रेल्वे मार्गावर एक थरारक घटना घडली आहे. कोकण रेल्‍वेच्‍या गेटमनची गोळ्या झाडून हत्‍या करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. कोलाडजवळील तिसे येथील रेल्‍वे फाटकाजवळ हा हत्येचा थरार रंगला. यामुळे रेल्वे फाटक परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोकण रेल्‍वे मार्गावरील कोलाड स्‍थानकाजवळ गेटमनची गोळया झाडून हत्‍या करण्‍यात आली. चंद्रकांत कांबळे असे असे हत्या झालेल्या गेटमनटे नाव आहे. मृ मोटरमन हा तेथून जवळच असलेल्‍या महाबळे गावचा रहिवासी आहे. गोळीबाराच्‍या घटनेनंतर आरोपी तेथून पसार झाला आहे. हल्‍लेखोर आणि हत्‍येमागचे कारण अद्याप समजू शकले नाही.


या हत्येचे वृत्त समजताच पोलीस घटनास्‍थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा सुरू केला. या घटनेनंतर महाबळे ग्रामस्‍थ घटनास्‍थळी पोहोचले. भर दिवसा हत्या झाल्याने ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले. जोपर्यंत मारेकऱ्याला अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्‍यात घेणार नाही अशी भूमिका त्‍यांनी घेतली होती. यामुळे येथे तणावाचे वातावरण होते. 


रायगडच्या दिवे आगारात समुद्रात थरारक बचाव कार्य


रायगडच्या दिवे आगारात समुद्रात थरारक बचाव कार्य झाले. गुजरातची बोट या समुद्राच बुडाली होती. या बोटीत असलेल्या 7 जणांना तटरक्षक दलानं वाचवले. समुद्रात बुडणा-यांना तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरच्या मदतीनं कसं वाचवण्यात आलं, याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दिवेआगार समुद्रातली  17 ऑगस्ट रोजी घटना घडली आहे. बोटीचा खालचा भाग तुटल्यानं बोटीत पाणी भरलं आणि ही बोट बुडाली. मात्र, वेळीच मदत पोहोचल्यानं बोटीतील 7 जणांना जीवदान मिळाले.


कार चालकाची हत्या करत मृतदेह त्र्यंबकेश्वरच्या आंबोली घाटात फेकला


भाड्याने घेतलेल्या कारचा चालकाची हत्या करत मृतदेह त्र्यंबकेश्वरच्या आंबोली घाटात फेकून कार घेऊन पसार झालेल्या तीन आरोपींपैकी दोघांना अटक करण्यात पालघर पोलिसांना यश आले आहे . पाच दिवसांपूर्वी पालघर मधील कार चालक आसिफ शेख याची कार भाड्यावर घेऊन तीन आरोपी नाशिक साठी निघाले होते . मात्र कार चोरण्याच्या उद्देशाने रस्त्यातच या आरोपींनी कार चालकाची हत्या करून त्याचा मृतदेह त्र्यंबकेश्वरच्या आंबोली घाटात फेकला . यानंतर कारचे मालक आणि मयत कार चालकाच्या कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादीनंतर पालघर पोलिसांनी सूत्र हलवत पहिल्या आरोपीला ओडिसातून तर दुसऱ्या आरोपीला नागपुर येथून चालत्या ट्रेन मधून अटक केली. या प्रकरणात तिसऱ्या आरोपीचा शोध पोलिसांकडून सुरू असून आर्टिका कार देखील ताब्यात घेण्यात आली आहे . कार चालकाची झालेली हत्या ही कार चोरण्याच्या उद्देशानेच करण्यात आल्याच पोलीस तपासात उघड झाले आहे .